१५ वर्षांनंतर जाने तू या जाने ना...चा सिक्वेल येतोय! जेनिलियासोबत झळकणार आमिर खान!!

 
महाराष्ट्राची लाडकी सून म्हणून अभिनेता रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूझा- देशमुख ओळखली जाते. लग्नाआधी तिने अनेक चित्रपटांत काम केले. तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे तिने रितेश देशमुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. रितेशसोबत लग्नानंतर तिने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता १० वर्षांनंतर ती पुन्हा मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये सक्रिय होत आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जाने तू या जाने ना या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ती दिसणार आहे. या चित्रपटात ती अमिर खानबरोबर झळकणार आहे.

२००८ मध्ये आलेल्या जाने तू या जाने ना चित्रपटात तिने आदितीची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता १५ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. या चित्रपटाद्वारे तिने आमिर खानचे मन जिंकले होते. काही आठवड्यांआधी जेनेलिया आणि आमिर खानची भेट झाली होती. त्यावेळी जेनेलियाने या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिल्याने ती आमिर खानच्या प्रोडक्शनसोबत काम करणार आहे. २००३ मध्ये तिने तुझे मेरी कसम या चित्रपटातून रितेश देशमुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रितेशचा सुद्धा तो पहिलाच चित्रपट होता.

दोघांची जोडी सेटवर चांगलीच जमली. तिथेच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये दोघांचे लग्न झाले. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जाने तू या जाने ना  या चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तिने  हिंदी, मराठी, तेलगू,  कन्नड, तामिळ, मल्याळम  भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र लग्नानंतर तिने चित्रपटात काम केले नाही. रितेश आणि जेनेलियाला दोन मुलं असून रियान आणि राहील अशी त्यांची नावे आहेत.