एका लेस्बियन मुलीने प्रियांकाला केले होते प्रपोज!
Mar 1, 2022, 10:17 IST
मुंबई : बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे. सध्या तिचा संपूर्ण वेळ ती बाळाला देत आहे. सध्या एका नव्या विषयामुळे ती चर्चेत आली आहे. एका लेस्बियन मुलीनं प्रियांकाला प्रपोज केलं होतं. तिने स्वतः या बद्दलचा अनुभव सांगितला आहे.
प्रियांका तिच्या लूकमुळे व स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असते. स्वभावातील मोकळेपणा तिने या अनुभवाबद्दल सांगतानासुद्धा दाखवला आहे. एका नाईट क्लबमधील ही घटना असल्याचे प्रियांकाने सांगितले. प्रियांका आणि ती मुलगी आधीपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र ती लेस्बियन असल्याचे प्रियांकाला माहीत नव्हते.
प्रियांका तिला म्हणाली, की मी अजिबात तशी मुलगी नाही. माझा एक बॉयफ्रेंड आहे आणि मला मुलांमध्येच इंटरेस्ट आहे. अर्थात प्रियांकाचा तेव्हा कुणी बॉयफ्रेंड नव्हता. मात्र तिला टाळण्यासाठी हे सर्व सांगावं लागलं, असे प्रियांका म्हणाली. कामाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास प्रियांका लवकरच शीला या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनयासोबत चित्रपटाच्या निर्मितीचा भारही तिने उचलला आहे.