हॉटेलमध्ये जॉन अब्राहमने खाल्ल्या ६४ चपात्या; वेटर म्हणाला, चावल अभी बाकी है...

 
मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. फिटनेसच्या बाबतीत तो कोणतीही तडजोड करीत नाही. जॉन त्याच्या तरुण वयात खाण्या - पिण्याचा सुद्धा शौकीन होता. एकदा हॉटेलमध्ये त्याने एकट्याने तब्बल ६४ चपात्यांवर ताव मारला होता. तेव्हा तिथल्या वेटरने अभी चावल बाकी है... असे म्हणत त्याची फिरकी घेतली होती. खुद्द जॉनने हा किस्सा खरा असल्याची कबुली दिली आहे.
जॉन अटॅक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची सहकलाकार रकुल प्रीत सिंगसुद्धा सहभागी झाली होती. कपिलने जॉनला प्रश्न केला, की तू एकाचवेळी हॉटेलमध्ये ६४ चपात्या खाल्ल्या होत्या ही अफवा आहे की सत्य? तेव्हा हा किस्सा खरा असल्याने जॉनने सांगितले. ६४ चपात्या खाल्ल्यानंतर चावल अभी बाकी है... असे म्हणत वेटरने फिरकी घेतल्याचे जॉनने सांगितले. दरम्यान, जॉनचा अटॅक हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस यांची भूमिका आहे.