सुष्मिता सेनचे ११ वे ब्रेकअप!; आता रोहमनशी फाटले!!

 
बॉलिवूडमध्ये प्रेम होणे आणि तुटणे सर्रास सुरू असते. काही महिने एकमेकांसोबत राहायचे, फिरायचे नंतर सोडून द्यायचे हे प्रकार नवीन नाहीत. त्‍यातल्या त्‍यात सुष्मिता सेनचे नाते तर इतक्या लोकांशी जोडले गेले आहे की, आता तिचा नवा बॉयफ्रेंड झाला की तो किती दिवस टिकणार, याची चर्चा आधीच सुरू होते. काही महिन्यांपासून ती मॉडेल रोहमन शॉल याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. दोघांतील एकूणच स्थिती पाहिली तर दोघे लग्नच करतील, अशीही चर्चा सुरू झाली. पण कशाचे काय सुष्मिता सेनचे हे लफडेही असेच तुटले आहे.

तिने रोहमनलाही आता सोडचिठ्ठी दिली असून, खुद्द स्वतःच सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर तिने स्वतःचा आणि रोहमन शॉलचा फोटो अपलोड केला. आमचे नाते मैत्रीने सुरू झाले होते, आम्ही मित्र राहूच... रिलेशनशिप आधीच संपले आहे. मात्र प्रेम शिल्लक आहेच, असे कॅप्शन तिने फोटोला दिले आहे. २०१८ पासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र आता त्यांचे ब्रेक अप झाले आहे.

२०२२ च्या फेब्रुवारी महिन्यातच सुष्मिताने एका पोस्टमधून विनाकामाच्या नातेसंबंधातून बाहेर पडण्याची भाषा केली होती. तेव्हापासून सुष्मिता आणि रोहमन शॉलमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर काल तिने याबद्दल सार्वजनिक खुलासाच केला. ऋतिक भसनी,  बंटी सचदेवा (सध्या हा सोनाक्षी सिन्हाच्या प्रेमात), साबिर भाटिया (हॉटमेलचा फाऊंडर), संजय नारंग (उद्योजक, अगदी साखरपुडाही झाला होता.), विक्रम भट्ट (दिग्ददर्शक), वसीम अकरम  (पाकिस्तानी क्रिकेटर), इम्तियाज खत्री, मानव मेनन (ॲड फिल्ममेकर), मुदस्सर अजीज (दिग्ददर्शक), रणदीप हुड्डा या मंडळींसोबत सुष्मिता यापूर्वी रिलेशनशीपमध्ये राहिलेली असून, आता १२ वा नंबर कुणाचा लागतो, याची चर्चा सुरू झाली आहे.