घरासमोरील तुळशीतील हे बदल दूर्लक्षित करू नका!

 
File Photo
बुलडाणा ः घरासमोर तुळस असणं लाभदायी असतं. आरोग्यासाठीही आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहावी म्‍हणूनही. तुळशीमुळे घरातील भांडण-तंटे कमी होतात. घरात सुख-शांतता नांदते. प्रत्येक हिंदू घराची ओळख दारातील तुळशी वृंदावनाने होते. मात्र कधीकधी या हिरव्यागार तुळशीत बदल होतो. तिची पाने गळतात. तुळस सुकते. तुमच्याही अंगणातील तुळशीत असे बदल जाणवू लागले तर दूर्लक्ष करू नका. कारण ही तुळस काही वेगळेच संकेत देत असते...
सुकलेली तुळस अत्यंत अशुभ मानली जाते. यामुळे घरात भांडण-तंटे, नकारात्मक ऊर्जा पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे सुकलेली घरात कधीच ठेवू नका. नवी तुळस आणून लावा. घरावर येणारं संकट तुळस आपल्यावर ओढून घेते असं म्‍हणतात. काहींकडे तुळस अजिबात टिकत नाही. याची कारणेही आहेत. अस्वच्‍छता, कायम सुरू असलेले वाद, अशांती, आर्थिक अस्थिरता यामुळे तुळस टिकत नाही. हे सर्व दूर करा. तुळस टिकून राहील, असे तज्‍ज्ञ सांगतात. घरातील एखादी व्यक्‍ती आजारी पडणार असेल तर तुळशीची पाने पिकतात आणि गळायला सुरुवात होते. तुळशीची वाढ थांबते. हा संकेत वेळीच ओळखा आणि सर्वांच्या आरोग्याकडे काळजीने लक्ष घाला. तुळशीला पाणी, ऊन देऊन तिला पुन्हा हिरवाईकडे घेऊन जा.