व्हॉटस् ॲपवर ब्लॉक झालात? वापरा या सोप्या ट्रिक, करू शकाल मेसेज...

 
बुलडाणा : ब्रेकअप किंवा भांडणामुळे अनेकदा जोडीदार किंवा मित्र-मैत्रिण ब्लॉक करत असते. त्‍यामुळे आपण तिचे अथवा त्‍याचे स्टेटस पाहू शकत नाही की त्‍याला अथवा तिला मेसेजही कर शकत नाही. अशावेळी दोन सोप्या ट्रिक वापरून आपण ब्लॉक असूनही मेसेज करू शकतो किंवा स्टेटस पाहू शकतो.

काय कराल?

  • नवीन खाते उघडा ः फोनमध्ये व्हॉटस् ॲप उघडा. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन तुमचा नंबर टाकून खाते डिलीट करा. नंतर पुन्हा प्ले स्टोअरवर जाऊन व्हॉटस् ॲप इन्स्टॉल करा. पुन्हा खाते उघडा. आता ज्याने तुम्हाला ब्लॉक केलंय. त्याला तुम्ही सहज मेसेज पाठवू शकता. मात्र व्हॉटस् ॲप डिलीट केल्यानंतर तुम्ही आधीच्या सर्व ग्रुप मधून आपोआप बाहेर पडाल. आधीचे सर्व मेसेज डिलीट होतील. पण तुमच्या खास व्यक्तीशी बोलयचं म्हटल्यावर एवढी जोखीम तर घ्यावी लागेलच ना भाऊ...
  • ग्रुप तयार करून करा मेसेज ः तुम्हाला ब्लॉक करणाऱ्या व्यक्तीला मेसेज करण्यासाठी मित्र किंवा कुटुंबातल्या सदस्यांच्या मदतीने एक ग्रुप तयार करा. ज्याने तुम्हाला ब्लॉक केलंय त्यालाही ग्रुपमध्ये समाविष्ट करा. ग्रुप केल्यानंतर मित्र आणि कुटुंबियांना त्या ग्रुपमधून बाहेर पडायला सांगा. आता ग्रुपमध्ये ज्याने तुम्हाला ब्लॉक केलय तो आणि तुम्ही असे दोघेच असाल. आता या ग्रुपमधून तुम्ही त्याला मॅसेज करू शकता. या ग्रुपमध्ये तो अथवा ती बाहेर पडली की मग मात्र ही ट्रिकही काहीच कामी येणार नाही.