डॉक्टर बनण्यासाठी आता अकोला, औरंगाबाद, लातूर अन् कोट्याला जायची गरजच नाही! बुलडाण्याच्या पहेल इन्स्टिट्यूटमध्येच होणार

 "नीट" ची निट तयारी! जिल्ह्यातल्या २०० विद्यार्थ्यांनी काल घेतला प्रती नीट परीक्षेचा अनुभव!
 
बुलडाणा( वाणिज्य प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  वैद्यकीय प्रवेशासाठी नीट (NEET) ही राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात असतात. यावर्षी १७ जुलै ला ही परीक्षा पार पडणार असून विद्यार्थी त्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. दरम्यान जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी या परीक्षेची तयारी करण्यासाठी अकोला, औरंगाबाद, लातूर अन् राजस्थानातील कोटा या ठिकाणी जातात. मात्र आता डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नीट ची तयारी करण्यासाठी  आता दुसरीकडे जाण्याची गरजच पडणार नसून बुलडाणा शहरातच "पहेल इन्स्टिट्यूट" या विद्यार्थ्यांची निट तयारी करून घेणार आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचेही डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याचा मानस पहेल इन्स्टिट्यूटचा आहे.

 नीट परीक्षेला सामोरे जातांना परीक्षेचे वातावरण पाहून बरेच विद्यार्थी गोंधळून जातात. पेपर सोडवताना तब्बल ३ तास २० मिनिटे बसण्याची मानसिकता सुद्धा अतिशय महत्वाची ठरते. संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी , नवीन वातावरणात सोबत जुळवून परीक्षेला सामोरे जाणे. NEET परीक्षेचे नियम निट समजून घेणे, परीक्षा पद्धत समजून घेणे यासाठी काल, १९ जून रोजी "पहेल इन्स्टिट्यूडने" एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रती नीट परीक्षेचे  निःशुल्क आयोजन पहेल इन्स्टिट्यूडने केले होते. सकाळी १० वाजता बुलडाणा येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे पार पडलेल्या या परीक्षेचा जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. 

  तज्ञ प्राध्यापक मंडळी द्वारे या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. नीट परीक्षेच्या नवीन स्वरूपास ग्राह्य धरून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. हा अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी  पहेल इन्स्टिट्यूट चे संचालक तथा बायोलॉजी विषयाचे तज्ञ प्रा. निखिल श्रीवास्तव, बुलडाणा येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य व पहेल इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. राजेश्वर उबरहंडे, पहेल इन्स्टिट्यूट च्या संचालिका सौ. विद्या अरविंद पवार, मॅनेजर सिध्देश्वर मंडलकर,  प्रा.प्रविण रोकडे, प्रा.अर्जुन पंडित, चेतन प्रधान, नामदेव हिवाळे, प्रा.नयन इंगळे, प्रा.तेजस्विनी चौधरी यांनी परिश्रम घेतले. परीक्षेसाठी श्री शिवाजी विद्यालय बुलडाणाचे मुख्याध्यापक श्री आखाडे सर तथा समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. परीक्षा दिल्यानंतर पहेल इन्स्टिट्यूटच्या या अनोख्या उपक्रमाचा आम्हाला मुख्य परीक्षेसाठी मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. नीट परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी व पालकांना करावा लागणारा दूरवरचा व खर्चिक प्रवास, त्यासाठी होणारी प्रचंड तारांबळ व मानसिक त्रास दूर होण्यासाठी  व नीट परीक्षेच्या तयारीसाठी बुलडाण्यातच एक चांगला पर्याय पहेल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे हे विशेष..
या संदर्भातील अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पहेल इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आले आहे.
9011088121
8421088121
9766924900