INFO लग्नानंतरही नवऱ्याचे किंवा बायकोचे लफडे होण्याची ही आहेत कारणे..!
नात्यात अशी काही परिस्थिती उद्भवते की त्यामुळे नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होतो. लग्न करतांना चुकीचे कारण समोर ठेवून तसे केल्यानेही असे होऊ शकते. मुलगा किंवा मुलगी दिसायला चांगली आहे. दोन्हीकडे पैसा भरपूर आहे अशी कारणे समोर ठेवून लग्न लावल्या जात असेल तर भविष्यात ते चुकीचे ठरू शकते. इथे दोघांना दोघे खरचं पसंत आहेत का हा विचार होणे सुद्धा महत्वाचे आहे.
स्तुती कमी होते...!
लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायकोची किंवा बायको नवऱ्याची स्तुती करणे विसरून जाते. स्तुती करण्यात त्यांना कंटाळलेपणा वाटतो. त्यामुळे जेव्हा दुसरे कुणीतरी त्यांची स्तुती करते तेव्हा ती त्याच्यामागे जाते आणि त्यामुळे लफड्याला सुरुवात होते. त्यामुळे बायकोचं चांगल्या कामात कौतुक करा,तिला नेहमी प्रोत्साहित करा.
लग्नाची अती घाई..
जे लोक वयाच्या २० किंवा २१ व्या वर्षी लग्न करतात ते चाळिशीनंतर आपल्या जोडीदाराला कंटाळतात अन तिसऱ्याचा शोध घेतात. तसेच लवकरच मुलांचे पालक झाल्याने ते जीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत. एकमेकांविषयीची ओढ कमी झाल्याने लफड्याला प्रोत्साहन मिळते.
भावनिक बंध..
सर्व काही चांगले असूनही जोडप्यांमध्ये कधी भावनिक बंध तयार होत नाहीत.त्यामुळे तो किंवा ती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होते. नात्यामध्ये जेव्हा एखाद्या कडून समजूत दार पणा कमी होतो तेव्हाही नात्यात कटुता निर्माण होते.
वयाचे अंतर..
पती पत्नीत वयाचे अंतर अधिक असेल तर अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. तिच्या तारुण्यात जर तो वयस्कर होत असेल तर ती एखाद्या तरुण जोडीदाराच्या शोधत असते . त्यामुळे दोघांत जास्त अंतर नकोच...