मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज कुठे अन् कसा करायचा? कोणती कागदपत्रे आवश्यक? महिन्याला मिळवा १५०० रुपये...जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
Jul 2, 2024, 09:35 IST
बुलडाणा(जनहितार्थ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या या घोषणेचे महीलावर्गातून जोरदार स्वागत होत आहे. काल १ जुलैला अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी महिलांनी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय ,सेतू केंद्रावर गर्दी केलेली दिसली. वय वर्षे २१ ते ६० वर्षे वयोगटातील अशा महिला ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी काल, १ जुलैपासून सुरूवात झाली आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांना आधी उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे, ज्यात उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. या योजनेसाठी पात्र महिलांना महा ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज दाखल करता येईल.
योजनेसाठी कोण असणार पात्र?
- - या योजनेसाठी पहिली अट म्हणजे महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे.
- - वयाची किमान २१ वर्षे पूर्ण असली पाहिजे आणि ६० वर्षे वयापेक्षा अधिक नको.
- - विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- - अर्ज करणाऱ्या महिलेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- - अर्ज करणाऱ्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक नसावे.
- - अन्य शासकीय योजनांमधून महिन्याला १५०० किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांचा लाभ घेतलेला नसावा.
- - ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- - कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर, किंवा सेवानिवृत्तीचे वेतन घेणारा नसावा.
ही कागदपत्रे जोडावी लागणार..
- योजनेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष महा-ई-सेवा केंद्रावर अर्ज करावा.
- आधार कार्ड आवश्यक
- राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला.
- बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रेशनकार्ड
- योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र.
- अर्ज दाखल करताना महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक.
अर्ज कुठे भरायचा?
अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज भरता येतील.
अशी आहे प्रक्रिया
- अर्ज दाखल करण्याची मदत १ जुलै ते १५ जुलै
- प्रारूप निवड यादी प्रकाशित १६ ते २० जुलैप्रारूप यादीवर हरकत किंवा तक्रार दाखल करणे २१ ते २६ जुलै,ला
- भार्थी अंतिम निवड यादी १ ऑगस्ट रोजी प्रकाशित होईल.
- १४ ऑगस्ट पासून या लाडकी बहिण योजनेचा प्रत्यक्ष लाभ महिलांना मिळण्यास सुरूवात होईल.