धक्कादायक! सीजन लगीनसराईचा, जिल्ह्यात फेब्रुवारीच्या २७ दिवसांत ३७ जणी बेपत्ता! आई वडील शोधून शोधून थकले..

 
Rkfjkf
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षी लगीनसराईचा सीजन सुरू झाला की मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढते. दिवाळीनंतर हे प्रमाण अधिक वाढते. यावर्षीचे सध्याचे दिवस देखील त्याला अपवाद नाहीत. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत ३७ जणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे.
  जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात ३७ महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहेत. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये १८ ते ३० वयोगटातील अविवाहित मुलींची संख्या अधिक आहे. काही प्रकरणात विवाहिता महिला मुलाबाळांना घेऊन देखील गायब झाल्यात तर काही प्रकरणात नवविवाहिता देखील गायब झाल्या आहेत.
   
   १८ वर्षे वयाखालील महिला मुली , मुलगा बेपत्ता झाला तर पोलीस अपहरणाची नोंद करून तपास वेगाने हाती घेतात. मात्र १८ वर्षे वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती बेपत्ता झाल्यास पोलीस तेवढ्या गांभीर्याने ही प्रकरणे हाताळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बेपत्ता होण्याच्या बहुतांश प्रकरणाची कारणे ही प्रेमप्रकरणे असल्याचे समोर आले आहे तर काही प्रकरणात घरघुती वाद झाल्याने महिला ,मुली घर सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतात.