बुलडाणा लाइव्हच्या कार्यालयात छ्त्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन!
Feb 19, 2024, 15:25 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी जल्लोषात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. बुलडाणा लाइव्ह च्या कार्यालयात देखील आज १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल दादा म्हस्के यांचा वाढदिवस आजच, त्यामुळे त्यांच्या शुभहस्ते बुलढाणा लाईव्हच्या कार्यालयात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिववंदना केल्यानंतर अनिलजी म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा लाइव्ह परिवाराच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, सकाळचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन, बुलडाणा लाइव्हचे राहुल रिंढे, ओम सोळंकी, अक्षय थिगळे, अभिषेक वरपे यांची उपस्थिती होती.
येथील चिखली रोडवरील बुलडाणा लाईव्हच्या कार्यालयात शिवजयंती साजरा करण्यात आली. सत्कारमूर्ती अनिल दादा म्हस्के यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, अरुण जैन यांनी सुद्धा शिवचरणी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.त्यांनतर अनिल दादा मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा लाईव्ह परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाय ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी कवितेतून शुभेच्छा भावना व्यक्त करत अनिल दादांचा वृतात्मक प्रवासावर प्रकाश टाकला.