रायपूरच्या सारथी परिवाराचा राजधानी 'दिल्लीत' सन्मान! संस्थेचे अध्यक्ष समाधान पाटील आणि सचिव सादिक शाह यांना गौरविले..

 
रायपूर
रायपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रायपूर येथील सारथी परीवार सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष समाधान पाटील, सचिव सादिक शाह यांना ग्लोबल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरम दिल्लीद्वारे सन्मानित करण्यात आले. समाधान पाटील यांना राजे छत्रपती शिवाजी महाराज तर सादिक शाह यांना डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 
राजधानी दिल्ली येथील द्वारका सेक्टरमध्ये आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला ग्लोबल ह्यूमन राइट्स फोरमचे राष्ट्रीय व्हाईस प्रेसिडेंट काशीराम पैठणे, फाउंडर चेअरमन महानंदा सरकार दत्ता, महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर डॉ. प्रकाश खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक कार्याची तत्परता आणि सामाजिक कार्य म्हणून बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाधान पाटिल व सादिक शाह यांना यावेळी मान्यवरांनी सन्मानित केले.एवढेच नव्हे तर सारथी परीवार सेवा भावी संस्थेचा नेहमीच विविध उपक्रमांमध्ये अग्रस्थानी सहभाग असतो.