NDRF ची टीम बुलडाण्यात! जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमला दिले व्यवस्थापनाचे धडे ...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जून ते ३० जून या कालावधीमध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणी हे प्रशिक्षण होणार असून, प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुणे यांचे पथक जिल्हा मुख्यालयी आले आहेत. १८ जून रोजी जिल्हा पोलीस मुख्यालयी पोलीस कर्मचाऱ्यांकरिता हे प्रशिक्षण पार पडले. त्यानंतर १९ जुनला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण दिल्या गेले. दरम्यान, २४ ते २८ जून पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपूर्ण प्रशासकीय विभागात दिल्या जाणार आहे. 
 संपूर्ण देशभरात,(NDRF) नैसर्गिक आपत्ती बचावासाठी राष्ट्रीय आपत्ती बचाव व्यवस्थापन विभाग कार्य करते. यादरम्यान, विविध जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनेचे धडे प्रशासनाला दिल्या जातात. गेल्या वर्षी महाराष्ट्रात काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. विदर्भातील बुलढाणा जिल्हासुद्धा याला अपवाद नाही. मागील वेळी, संग्रामपूर, जळगाव जामोद या ठिकाणी आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. याप्रसंगी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची दमछाक झाल्याचे काहीसे चित्र होते. यंदाचा पावसाळा लक्षात घेता, पुन्हा तशी परिस्थिती आल्यास संपूर्ण प्रशासन सज्ज झाल्याचे या निमित्ताने दिसून येते.
सदर, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्भय जैन यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच तहसीलदार सामान्य प्रशासन श्रीमती संजीवनी मुपडे व तहसीलदार माया माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार बुलढाणा हे होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता महसूल सहाय्यक के. एस. जाधव व सांडू भगत व ऑपरेटर विष्णू बारस्कर यांचे सहकार्य होते.