NATIONAL NEWS! सप्तपदी सुरू असताना नवरदेवाचा प्रताप पाहून नवरी संतापली; भरमांडवात मोडले लग्न..नवरदेवाच्या बापाला देखील झाप झाप झापले...!!
(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला अविस्मरणीय क्षण..त्यामुळे लग्न अधिकाधिक चांगले होण्याचा आणि त्याच्या आठवणी जपण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.. जोड्याला जोडा मिळावा असे प्रत्येकाला वाटत असतं पण कधी कधी कुठे तरी फिस्कटत..उत्तर प्रदेशातील बांदा येथे एक वेगळीच घटना समोर आली आहे. सप्तपदी सुरू असताना नवऱ्याचे गुपित तिला कळाले. रागाच्या भरात ती लालबुंद झाली..एवढेच नव्हे तर नवरदेवाच्या बापालाही नवरीने झाप झाप झापले अन् लग्न मोडून निघून गेली...जेवून खावून सोहळा पाहत असलेली वऱ्हाडी मंडळी देखील हा प्रकार पाहून एकाएकी स्थब्द झाली.
झाले असे की उत्तर प्रदेशातील बांदा येथील लुकतुरा गावात हा विवाह सोहळा संपन्न होत होता. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. वर आणि वधुंनी एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या. वऱ्हाडी मंडळींची जेवणे झाली. मात्र सप्तपदी सुरू झाल्यावर नवीनच भानगड नवरीच्या लक्षात आली, त्यामुळे नवरी रागाने लालबुंद झाली.
नवरदेव निर्व्यसनी असल्याने लग्न जुळवतांना सांगण्यात आले होते.आमच्या मुलाला सुपारीच्या खांडाचे देखील व्यसन नाही असे नवरदेवाच्या बापाने नवरीच्या कुटुंबीयांना सांगितले होते. निर्व्यसनी आणि सज्जन मुलगा मिळाल्याने नवरी आणि तिचे कुटुंबीय आनंदात होते. मात्र लग्नात सप्तपदी सुरू असताना नवरदेव मुलगा अडखळत चालत असल्याचे नवरीला समजले. काही वेळातच त्याचा तोल जावू लागला, नवरीने नवरदेवाच्या थोडे जवळ जाऊन पाहताच नवरदेवाच्या तोंडाचा दारूचा वास आला.
अपेक्षाभंग झाल्याने नवरी चांगलीच संतापली. भर मांडवात तिने नवरदेवाच्या थोबाडात हाणली. नवरदेव निर्व्यसनी असल्याचे सांगणाऱ्या नवरदेवाच्या बापाला देखील तिने झापले अन् लग्न मोडल्याचे सांगत भर मांडवातून नवरी निघून गेली. या प्रकरणानंतर दोन्ही पक्षांकडील मंडळी देखील काही वेळ आमने सामने आली होती. मात्र समझोता होऊ शकला नाही तर नवरदेवाला तसेच वापस जावे लागले.