चिखलीत आज महायुतीच्या महाविकासाच्या महादहीहंडीचा माहौल रंगणार!.आ. श्वेताताई महालेंचे आयोजन; सैराट फेम रिंकू राजगुरू, बॉलिवूड स्टार जरीन खान विशेष आकर्षण...

 
Ufkf
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या चिखलीत आज धमाकेदार सांस्कृतिक माहौल रंगणार आहे. चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी महायुतीच्या महाविकासाची महादहीहंडी आयोजित केली आहे. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून या दहीहंडीची ओळख आहे. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, बॉलीवूड स्टार जरीन खान या सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहेत.. छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणारा हा सोहळा चांगलाच रंगतदार ठरणार असल्याने सबंध चिखलीकरांसाठी या सोहळ्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहेत..
Add
Advt.👆

 

आमदार श्वेताताई महाले पाटील दरवर्षी महादहीहंडीचे आयोजन करीत असतात. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून या सोहळ्याने नावलौकिक मिळवला आहे. आज होणाऱ्या या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यात सहभागी गोविंदा पथकांना तब्बल ५ लाख ११ हजार १११ रुपयांच्या जंगी बक्षीसांचे वितरण होणार आहे. DJ राज, DJ मोनिका,अंकिता देखील या सोहळ्यात उपस्थित राहणार असून या महासोहळ्याला ते चार चाँद लावणार आहेत.. बुलडाणा लाइव्ह च्या युट्युब प्लॅटफॉर्मवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे...