BULDANA LIVE EXCLUSIVE केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना किती पगार मिळणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि इतर मंत्र्यांचा पगार किती? जाणून घ्या...

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्यासह एकूण ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली,यात ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३७ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. काल,१० जूनच्या सायंकाळी मंत्र्यांना खातेवाटप देखील करण्यात आले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयश्री खेचून आणणाऱ्या प्रतापराव जाधव यांना शिवसेनेच्या कोट्यातून स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद देण्यात आले. आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद अशा दोन मंत्रालयाचे कामकाज आता ना.प्रतापराव जाधव सांभाळणार आहेत. मंत्री या नात्याने ना.जाधव यांना केंद्र सरकारच्या वतीने विविध सुविधा देण्यात येणार आहेत. त्यात पगार, निवास, सुरक्षा, प्रवास यासह फोन बिल, टपाल, संगणक, चालक यासह विविध भत्ते दिले जातात.
 पंतप्रधानांसह सर्वच कॅबिनेट ,स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांना या सुविधा मिळतात. सर्वांच्या तुलनेत पंतप्रधांनाना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतात. त्याखालोखाल कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांचा क्रमांक लागतो. पंतप्रधानांना दरमहा २ लाख ३३ हजार भत्ता मिळतो. कॅबिनेट मंत्र्यांना २ लाख ३२ हजार तर स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांना २ लाख ३१ हजार एवढे वेतन मिळते.राज्यमंत्र्यांना २ लाख ३० हजार ६०० रुपये एवढे वेतन मिळते. ना.प्रतापराव जाधव स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री असल्याने त्यांना ३ लाख ३१ हजार एवढे वेतन मिळणार आहे. याशिवाय त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळणार आहे.