२० वर्षाच्या तरुणांनाही येतोय हार्टअटॅक! "ही" एक वाईट सवय पडतेय प्रचंड महागात; तुम्हीही तसे करत असाल तर थांबवा नाहीतर....

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात दरवर्षी ७ लाखांपेक्षा अधिक मृत्यू हार्ट अटॅक ने होत आहेत..विशेष म्हणजे यात ४० वर्षाच्या आतील लोकांची संख्या वाढत आहे..एव्हढेच नव्हे ते २० ते २० वर्षे वयाच्या मुलांना देखील हार्ट अटॅक ने मृत्यू झाल्याची देशात २५ टक्के प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तरुण मुलांची एक वाईट सवय हृदयविकारासाठी कारणीभूत ठरत आहेत..
पूर्वी सहसा वृध्दांना हार्ट अटॅक यायचा, मात्र आता तरुण मुले हृदयविकाराचे शिकार होत आहे. जे वय करिअर बनवण्याचे आहे, जीवनाचे ध्येय ठरवायचे आहे त्या वयात चुकीच्या सवयी लागल्याने तरुण हृदय विकाराचा धोका स्वतःवर ओढवून घेत आहेत.
   
    
तरुण मुले चुकीच्या सवयीला बळी पडत आहेत. चुकीची जीवनशैली हृदयविकाराचे मुख्य कारण बनत चालली आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी, वेळी अवेळी झोपण्याच्या सवयी आणि करिअरचा अधिकचा ताण यामुळे देखील हृदयविकाराची शक्यता वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. चुकीच्या पद्धतीने काम करण्याच्या सवयी देखील तरुणांना हृदयावर खोलवर परिणाम करीत आहेत.
    लठ्ठपणा हे हृदयविकाराचे महत्वाचे कारण आहे. मात्र असे असले तरी कमी वजनाच्या लोकांना देखील चुकीच्या सवयीमुळे हृदयविकाराची शक्यता नाकारता येत नाही. लठ्ठपणा मुळे हृदयावर विपरीत परिणाम होतो. जंकफूड अर्थात बाहेरचे आणि तळलेले अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो, त्यामुळे बाहेरचे खाण्याची चुकीची सवय बंद करून घरी शिजवलेले ताजे अन्न सेवन करण्याकडे तरुणांनी भर दिला पाहिजे. 
   जास्त वजनामुळे हृदयावर दबाव वाढतो आणि शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते हे हृदयासाठी अत्यंत धोकादायक आह. वाढलेले कोलेस्टेरॉलचे रक्तवाहिन्या ब्लॉक करते आणि त्यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही,अशाने हृदयविकाराचा धोका दहापटीने वाढतो..हे रोखण्यासाठी दररोज व्यायाम आणि हेल्थी आहार घेणे आवश्यक आहे..