अनोळखी मुलीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नको भावा! नाहीतर होईल मोठे मॅटर! सेक्सटॉर्शनच्या घटना वाढल्या; कसे होते कांड वाचा..

 
बदनामीची
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वसामान्य लोकांची विविध मार्गानी फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी नवीनच प्रकार सुरू केला आहे. फेसबुकवरून मुलीच्या नवाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर व्हॉट्सअप क्रमांकाची मागणी केली जाते, त्यानंतर व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग सुरू होते. जिल्ह्यात अशी तक्रार दाखल झाली नसली तरी अनेक जणांची अशी फसवणूक झाली आहे. बदनामीच्या भीतीने कुणीही तक्रार करण्यास येत नसल्याचे चित्र आहे. सायबर सेलने याविषयी नागरिकांची ऑनलाईन जागृती सुरू केली आहे.
ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार विविध फंडे वापरतात. गत काही वर्षांपासून फसवणुकीच्या या प्रकाराबाबत जनजागृती होत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी नवीन मार्ग निवडला आहे. फेसबुकवर तरुण, मध्यमवर्गीय लोकांना सुंदर मुलीचा फोटो असलेल्या प्रोफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येते. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मुलीच्या नावाने संदेशाचे आदान प्रदान सुरू होते. यादरम्यान, व्हॉट्सअप क्रमांक होतात. व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन रेकॉर्डिंग करून त्याची रेकॉर्डिंग संबंधित व्यक्तीला पाठवून पैशांची मागणी करण्यात येते. वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन करून संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यात येते. अनेक जण बदनामीच्या भीतीने मागेल तेवढे पैसे संबंधितांच्या खात्यात टाकतात. शिवाय कुणाला काहीही सांगत नसल्याने सायबर गुन्हेगारांचे फावते. त्यामुळे फेसबुकवर अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.   
अशी करतात फसवणूक
फेसबुकवरून संदेशाचे आदानप्रदान केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप क्रमांक विचारल्या जातो. व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल सुरू होतात. या कॉलदरम्यान उत्तेजित करून आपले नग्न फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येते. त्यानंतर ती रेकॉर्डिंग संबंधिताला पाठवून व्हायरल करण्याची भीती दाखवण्यात येते. व्हिडिओ नातेवाइकांपर्यंत पाठवण्याची भीती दाखवण्यात येते. त्यामुळे त्यांच्या जाळ्यात अनेक जण फसतात तसेच त्यांनी मागितलेले पैसे अनेक जण देऊन टाकतात.
बदनामीची भीती...
अनेक जण फसवणूक झाली तरी पोलीस स्टेशन किवा सायबर सेलकडे तक्रार देत नाही. घडला प्रकार कुणालाही सांगत नाही त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावते. जिल्ह्यात असे अनेक प्रकार घडले असले, तरी तक्रार मात्र एकही तक्रार दाखल झालेली नाही.
अशी घ्यावी खबरदारी!
अनोळखी मुलीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास स्वीकारू नये. चुकून फ्रेंड रिक्वेट स्वीकारली तरी त्या मुलीला प्रतिसाद देऊ नये. फसवणूक झाल्यास तातडीने जवळचे पोलीस स्टेशन किवा सायबर सेलकडे तक्रार करावी.
फेसबुकवर अनोळखी मुली फ्रेंड रिक्वेट पाठवतात त्यानंतर व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून उत्तेजित करतात नग्न व्हिडिओ कॉलचे रेकॉडिंग करून ब्लॅकमेल करतात त्यामुळे अशा फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार दाखल करावी. सायबर सेलकडून याविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे.