आपल्या मुलालाही बनवायचंय ना डॉक्टर इंजिनिअर? पण परिस्थितीने खचला आहात?
संवाद पत्र
आदरणीय,
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत माझ्या पाल्याने घवघवीत यश मिळवून तो यशाच्या उच्चतम शिखरावर पोहोचेल तरच आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल होऊन त्याच्या जीवनाचे सार्थक होईल असे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक व विद्यार्थी हे दोघेही रात्रंदिवस धडपडत असतात.
पालकांचे व विद्यार्थ्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या पध्दतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता व चिकाटी महत्वाची असते त्याच पध्दतीने त्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या उत्कृष्ट व परिपक्व मार्गदर्शकाची किंवा एखाद्या नामांकित क्लासेसचीही गरज असते. त्यासाठी प्रत्येक पालक हा आपल्या पाल्यांना NEET/JEE किंवा MHT-CET ची तयारी करण्यासाठी अशा नामांकित व दर्जेदार क्लासेसच्या शोधात बाहेरगावी म्हणजेच कोटा, लातूर अशा मोठमोठयाशहरात पाठवित असतात. अशा ठिकाणी शिकवणी शुल्क व राहण्याचा लाखो रुपये खर्च करुन हे विद्यार्थी अतिशय त्रास सहन करत तेथे शिक्षण घेत असतात.
आपल्या पाल्यात गुणवत्ता असतांना सुध्दा प्रत्येक पालकांना आपल्या पाल्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करुन बाहेरील शहरात शिक्षणासाठी पाठविणे सोयीस्कर नसते. अशा वेळेस प्रत्येक पालकांना मनोमनी वाटते की, कोटा येथील एखादा नामांकित व दर्जेदार क्लास बुलडाणा शहरात असता तर किती बरे झाले असते !
हाच विचार अनेक पालकांनी व विद्यार्थ्यांनी माझ्याकडे पाच वर्षाअगोदर व्यक्त केला होता. याच अनुषंगाने NEET आणि JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच हुशार व होतकरु विद्यार्थ्यांच्या महत्वकांक्षेला मूर्तरुप देण्यासाठी भारतातील उत्कृष्ट क्लासेस पैकी CAREER POINT, KOTA या नामांकीत व दर्जेदार क्लासेसची शाखा आपल्या बुलडाणा शहरात माझ्या समन्वयाने मागील चार वर्षापासून यशस्वीरीत्या सुरु आहे. सदर या क्लासेसच्या प्रथम बॅच (2020-2022) मधील 35 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थ्यांची मेडिकल म्हणजेच एमबीबीएस साठी निवड झालेली असून द्वितीय बॅच (2021-2023) मधील 100 पैकी 11 विद्यार्थ्यांची एमबीबीएस साठी निवड झालेली आहे. तसेच सर्व निवड झालेले विद्यार्थी गरीब व होतकरु असल्याने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मी स्वतः सर्व विद्यार्थ्यांची प्रथम वर्षाच्या एमबीबीएसचे (शासकीय) महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क पूर्णपणे मी भरले व यापैकी दोन विद्यार्थ्यांचे संपूर्ण एमबीबीएसचे प्रवेश शुल्क भरणार आहे.
आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अशीच गुणवत्ता व शिक्षणाप्रती आवड असल्यास त्याला 11 वी व 12 वी च्या क्लासेसमध्ये अध्यापन करण्यास आम्हास आवडेल. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्षे 2024-2026 साठी प्रवेश प्रक्रियासुरु झालेली आहे. NEET, JEE, MHT-CET च्या बॅचेस 1 एप्रिल पासून सुरु होईल. गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना विशेष सवलत म्हणून (NEET/JEE) पहिल्या 25 विद्यार्थ्यांची दोन वर्षाची एकत्रित संपूर्ण (शैक्षणिक साहित्यासहीत) फीस रु. 99,000/- ठेवले होते. त्या अनुषंगाने त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतू अजूनही काही पालकांच्या आग्रहास्तव आम्ही अजून पुढील 25 विद्यार्थ्यांसाठी तेवढीच फीस म्हणजेच रु. 99,000/- Head Office - Career Point, Kota कडून मंजूर करुन घेतलेली आहे व MHT-CET साठी दोन वर्षाची (25 विद्यार्थ्यांसाठी) एकत्रित फी रु. 60,000/- असणार आहे.
तरी सर्व सन्माननिय पालक व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की या CAREER POINT, KOTA शाखा बुलडाणा या क्लासेसच्या यशस्वीतेसोबत आपणही सहभागी व्हावे व आपल्या ध्येय स्वप्नपूर्तीकडे यशस्वी वाटचाल करावी.
आपला
विजय पवार
संचालक,
Career Point Buldhana
9604092327