"बुलडाणा लाइव्ह" चा जगाच्या कानाकोपऱ्यात डंका !

अमेरिका, इंग्लंड, स्वीडन, नॉर्वे,  जपान, चीन, सिंगापूर, जर्मनीसह ५० देशांतील बुलडाणेकर "बुलडाणा लाइव्ह" वाचतात अन् राहतात मायभूमीच्या घटना घडामोडीबाबत अपडेट..! हे आम्ही नाही Google analytics चा रिपोर्ट सांगतो..

 
bl
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  निःपक्ष, निर्भिड, सडेतोड अन् प्रामाणिक पत्रकारिता म्हणजे काय असते हे जिल्हावासियांना अल्पावधीत दाखवून देणाऱ्या "बुलडाणा लाइव्ह"च्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस सातत्याने वाढतच आहे. केवळ बुलडाणा जिल्हाच नव्हे तर देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात राहणारे बुलडाणेकर "बुलडाणा लाइव्ह" च्या माध्यमातून जिल्ह्यात घडणाऱ्या घटना घडामोडी बाबत अपडेट राहतात. जगभरातील ५० देशांतून आता बुलडाणा लाइव्ह वाचल्या जात असल्याचे 'Google analytics" चा अहवाल सांगतो.

fghj

 ( जाहिरात  )

एका दिवसाला साडेतीन ते पावणेचार लाख लोकांपर्यंत पोहणारे बुलडाणा लाइव्ह हे जिल्ह्यातील एकमेव माध्यम आहे. सडेतोड राजकीय विश्लेषण, गुन्हेगारीविषयक वार्तांकन, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आणि सामान्यांच्या समस्या बुलडाणा लाइव्ह सातत्याने मांडत असते. त्यामुळे जिल्ह्यातील गावागावात आता "बुलडाणा लाइव्ह" चा मोठा वाचकवर्ग तयार झाला आहे. जिल्ह्यात घडलेली कोणतीही घटना, राजकीय बातमी, त्यावरील विश्लेषण वाचकांना काही मिनिटांत वाचायला मिळते, त्यामुळे आता जगभरातील बुलडाणेकरांना "बुलडाणा लाइव्ह" ची भुरळ पडली आहे. अमेरिका, जपान, जर्मनी, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया, इग्लंड, चिन, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिरात यासह जगभरातील ५० देशांतील वाचक "बुलडाणा लाइव्ह" वाचतात. यात अमेरिकेतील भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. विदेशातून दररोज ९ ते १३ हजार वाचक बुलडाणा लाइव्ह वाचतात, त्यात निम्मी संख्या ही एकट्या अमेरिकेतून आहे हे विशेष.

(जगाच्या नकाशात पहा कुठे कुठे वाचल्या जाते बुलडाणा लाइव्ह..! ( जो भाग निळ्या रंगात दाखवलेला आहे, तिथे बुलडाणा लाइव्ह वाचल्या जाते)

bl