भाऊ ५० बाया पाह्यजे होत्या प्रचारासाठी हिंडायले.! ३०० रुपये रोज देतो, पाठवता काय? लोकसभेच्या रणधुमाळीत गर्दी जमवण्यासाठी उमेदवारांची होतेय दमछाक...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एप्रिलच्या रणरणत्या उन्हात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. लोकांमध्ये मिसळणारा उमेदवार नसला, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची देणेघेणे नसले आणि उमेदवार ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये दिसायला लागला की कशी फजिती होते याचे जिवंत उदाहरण सध्या निवडणूक प्रचारादरम्यान येत आहे. अनेक उमेदवारांना प्रचारासाठी माणसे मिळणे कठीण झाले आहे. सभेत, रॅलीत महिलांची गर्दी दिसावी म्हणून ३०० रुपये रोजाने महिलांना प्रचारासाठी मागणी आहे. बोटावर मोजण्याइतक्या उमेदवारांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच उमेदवारांची हीच अवस्था आहे..
Advt
 Advt.👆
सध्या घसरलेला राजकारणाचा स्थर पाहता सामान्य लोकांचा राजकीय व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. "तुमचाच गेरू अन् तुमचाच चुना......भाऊंना निवडून आणा" या घोषणा देण्याचे दिवस आता संपले आहेत. राजकीय पक्षांचे नेते आता स्वतःचा,कुटुंबाच्या स्वार्थापुरता विचार करतात त्यामुळे नेत्यांबद्दल कार्यकर्त्यांना आत्मीयता ,प्रेम राहिले असल्याचे दिसत नाही. त्यामुळे नेत्याच्या निवडणुकीत नेत्याला कसे लुटता येईल असाच विचार कार्यकर्ते करतांना दिसतात. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील असाच प्रकार सुरू आहे. नेत्यांची सामान्य लोकांशी नाळ जोडलेली असली की पैसे देऊन भाड्याने माणसे आणायची गरज पडत नाही, लोक अशा नेत्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असतात. मात्र हल्ली अशा नेत्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आपली हवा दिसली पाहिजे यासाठी गर्दी जमवण्यासाठी उमेदवारांची दमछाक होतांना दिसत आहे. रॅली ,सभांमध्ये पुरुष कार्यकर्त्यांची संख्या असतेच पण महिलांची संख्या दिसावी म्हणून ३०० रुपये रोजंदारीचा फंडा अनेक उमेदवारांकडून अवलंबल्या जात आहे,म्हणून उमेदवार किंवा उमेदवारांचे कार्यकर्ते म्हणतात 
"भाऊ ५० बाया पाहिजे होत्या प्रचारासाठी हिंडायले, ३०० रुपये रोज देतो पाठवता काय?"