BREAKING अबब! तळपत्या उन्हात धावते मालवाहू वाहन पेटले; डोणगाव ते लोणी रस्त्यावरील घटना ..बघा व्हिडीओ !
May 7, 2024, 17:11 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव ते लोणी रस्त्यावर धावणाऱ्या एका मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेत वाहन मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवाहू वाहन डोणगाव वरून लोणी येथे जात असताना ही घटना घडली आहे, सध्या उन्हाची तीव्रता जास्त आहे. अशातच वाहनाचे इंजिन गरम झाले आणि शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असावी , असा अंदाज व्यक्त होत आहे. आगीनंतर वाहनाचा केवळ सांगाडा शिल्लक राहिलाय.