BIRTHDAY SPECIAL कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही हो, पण गगनभरारीच वेड रक्तातच असावं लागत! माधुरीताई देवानंद पवार यांनी दाखवून दिलं आम्ही कुठेच कमी नाही!

वाचा सप्तशृंगी महिला अर्बनच्या अध्यक्षांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल....

 

जानेफळ(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वातंत्र्यप्राप्त होऊन ७५ वर्षे झालेत आपल्याला. कायदा करून महिलांना प्रतिनिधीत्व देताही आले अनेक क्षेत्रात..मात्र महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आपल्याला कायदा करण्याची गरज पडावी हे जरा अतीच होत ना, महिषासुरमर्दिनीची भक्ती करणाऱ्यांच्या देशात?..मात्र काही महिला अशा आहेत ज्यांना स्वतःच कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी कायद्याचा आधार घेण्याची गरज पडत नाही.. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील हो, पण गगनभरारीच वेड रक्तात असावं लागत..कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही म्हणतात...असच गगनभरारी घेण्याचं वेड ज्यांच्या रक्तातच आहे, ज्यांनी अल्पावधीत स्वतःच कर्तुत्व सिद्ध करून दाखवलं त्या माधुरीताई देवानंद पवार यांचा आज,१८ ऑक्टोबरला वाढदिवस! त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न..!

mt

मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द सारख्या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या माधुरीताई आज सप्तश्रृंगी महिला अर्बनच्या यशस्वी अध्यक्षा आहेत. सहकार क्षेत्रात आज सप्तश्रृंगी महिला अर्बनने  जो नावलौकिक मिळवलाय त्याचे सर्वार्थाने श्रेय जाते ते माधुरीताई पवार यांनाच..वडील देवानंद पवार यांच्याकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा नेटाने जोपासत त्यांनी आपली यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.
 प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून घेतलेल्या माधुरीताईंचे माध्यमिक शिक्षण प्राध्यापक एन डी पाटील महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी खामगावच्या गोसे महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे बीएससी चे शिक्षण पूर्ण करून पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात एमए केले. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच सामाजिक कार्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पर्यावरण संवर्धन महिला सक्षमीकणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. खामगावच्या गोसे महाविद्यालयात शिकत असताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी २ हजार महिला व विद्यार्थिनींना "कचऱ्यातून कला" या विषयाचे प्रशिक्षण त्यांनी दिले. त्याचवेळी त्यांनी प्लास्टिक निर्मुलनाचा विषय देखील हाताळला, प्लास्टिक पिशव्यांचा पूर्नवापर कसा करायचा याचेही प्रशिक्षण त्यांनी दिले. एनएसएस च्या माध्यमातून २०१८ च्या आव्हान कॅम्प चे बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्व त्यांनी केले, यातून त्यांच्यातील नेतृत्वकौशल्य फुलत गेले..!

mt

  अन् माधुरीताई अध्यक्षा झाल्या..

११ फेब्रुवारी २०२२ ही तारीख माधुरीताईंना अन् सप्तशृंगी महिला अर्बनच्या हितचिंतकांना चांगलीच लक्षात राहील..कारण याच दिवशी माधुरीताई सप्तशृंगी महिला अर्बनच्या अध्यक्षा झाल्या अन् लागलीच त्यांनी झपाट्याने कामाला सुरुवात केली. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतले. महिलांसाठी , महाविद्यालयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड हिंडींग आणि डिस्पोजल मशीन चे संस्थेच्या माध्यमातून वितरण करण्यात आले. मेहकर येथील दोन महाविद्यालयात आणि जानेफळच्या सरस्वती महाविद्यालयात हे मशिन्स देण्यात आले. स्वतः महाविद्यालयीन शिक्षण घेतांना मुलींना येणाऱ्या अडचणींची जाण असल्याने महाविद्यालयीन मुलींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात ७ हजार रुग्णांची सेवा त्यांच्या हातून घडली, शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना आपलंस करणाऱ्या माधुरीताईं आपली मुलगीच आहे अशा भावना अनेक माय माऊल्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

mt

संस्थेची प्रगती...

अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संस्थेची प्रगती करणाऱ्यावर माधुरीताईंनी विशेष लक्ष दिले. त्यांनी पदभार घेतल्यानंतर  ठेवी मध्ये एकाच वर्षात १३ कोटी रुपयांची वाढ झाली. काम करतांना संस्थेच्या कर्मचाऱ्यांना स्फुरण मिळावे, संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान व्हावा म्हणून त्यांनी कर्मचारी सन्मान पुरस्काराची सुरुवात केली.संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांचा सन्मान, परिसरातील गुणवंतांचा गौरव असे विविध उपक्रम त्या राबवितात. रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने परिसरातील १ लाख भावांना दरवर्षी त्या राख्या पाठवतात..हा देखील एक रेकॉर्डच..!! संस्थेच्या माध्यमातून मेहकर शहर आणि मेहकर ग्रामीण भागासाठी स्वर्गरथाची सोय देखील त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. जानेफळ ,हिवरा खुर्द, ईसोली, मंगरूळ नवघरे, उदयनगर, घाटबोरी, पांगरखेड, वेणी, अंजनी बुद्रुक आणि मेहकर या ठिकाणी आता संस्थेचा विस्तार झाला आहे . 

mt

सामाजिक संवेदना जोपासणाऱ्या ताई...

शेतकरी, शेतमजुर, आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून माधुरीताई विविध योजना राबवित असतात. हिवरा आश्रम येथे प्रा. अनंत शेळके नित्यानंद अनाथ आश्रम चालवतात. या संस्थेला माधुरीताईंनी तात्काळ ५० हजार रुपयांची मदत केली. दाताळा येथील वृद्धाश्रमासाठी ३१ लोखंडी बेडची व्यवस्था देखील त्यांनी करून दिली. याशिवाय पळसखेड येथील सेवासंकल्प संस्थेला देखील ब्लॅंकेट ची व्यवस्था माधुरीताईंनी करून देत सामाजिक संवेदना जोपासल्या..! माधुरीताईंच्या या सेवाभावी कार्याला वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा..!!