BIRTHDAY SPECIAL सज्जन राजकारणी; बॅनरबाजी, पोस्टर बाजी नाही कृतिशील कार्यक्रमांवर भर देणारा माणूस! नागरिकांना आरोग्य कार्ड अन् वर्षभर कोणताही उपचार होणार मोफत! शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी - बियाणे!

योगेंद्र गोडेंचा वाढदिवस समाजासाठी ! म्हणाले, पक्षाकडे काही मागणार नाही फक्त लढायची संधी मागेल..!

 
yg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राजकारण अन् तेही सज्जन माणसाचे.. छे छे..हल्ली ही बाब फारच दुर्मिळ होत चाललीय ना..पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच की हो..भाजपचे प्रदेश प्रतिनिधी तथा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे हे त्यांच उदाहरण!  राजकारणात असणारी माणसं कपटी असतात, सुड उगवणारी असतात, कार्यकर्त्यांचा वापर करून घेणारी असतात.. त्यांचा त्यांचा स्वार्थ साधणारी असतात..असा सूर नेहमी सामान्यांकडून उमटत असतो..अर्थात  लोकांना राजकारण्यांकडून येत असलेल्या अनुभवातून या प्रतिक्रिया उमटत असतात, त्यामुळे लोक म्हणतात ते चूक नाहीच..! त्यामुळेच राजकारण्यांच्या या भाऊगर्दीत काही चेहरे सामान्य माणसांना आपले वाटतात.. योगेंद्र गोडे हे नावही तसेच..! योगेंद्र गोडेंना फोन केला म्हणजे आपला फोन उचलल्या जाईल..आपल्याशी "उर्मटपणे" नव्हे  "सज्जनपणे" संवाद साधला जाईल..आपले काम होईल असा विश्वास लोकांना वाटत असतो. मग ते काम दवाखान्याचे असो, शेतीचे असो ची गावच्या एखाद्या समस्येचे..! लोकप्रतिनिधी नसतांना देखील योगेंद्र गोडेंबद्दल एवढा विश्वास वाटत असेल तर "कुछ तो बात है" असेच म्हणावे लागेल. आज २५ मे रोजी योगेंद्र गोडेंचा वाढदिवस! त्यानिमित्त त्यांच्या कामाचा हा थोडक्यात घेतलेला आढावा..!

 वडील डॉक्टर नंतर आमदार अन् गृहराज्यमंत्री..अशा सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या योगेंद्र गोडेंना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खरे तर सरळ साधा मार्ग निवडता आला असता. यशस्वी व्यावसायिक, उद्योजक होता आले असते. मात्र ज्या समाजाच्या भरवश्यावर आपण मोठे होते त्या समाजाला व्याजासह परतफेड करायची असते या विचारांनी राजकारणाचा अनिश्चित असलेला मार्ग त्यांनी निवडला. मात्र राजकारण करीत असताना,पक्ष वाढवताना समाजकारण कसे होईल याकडे त्यांचा अधिक भर असतो. ९० टक्के समाजकारण अन् १० टक्के राजकारण हे सूत्र योगेंद्र गोडे कटाक्षाने पाळतांना दिसतात.

 २१ व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य..
    
वयाच्या २१ व्या वर्षी योगेंद्र गोडे नावाच्या तरुणाने राजकारणात एन्ट्री केली ती विजयाची माळ घेऊनच. सलग १० वर्षे डोंगरखंडाळा गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी प्रतिनिधीत्व केले. नंतरच्या काळात संधी मिळेल तिथे आपल्या कामाचा ठसा उमटविण्याचे काम त्यांनी केले.

शेतकऱ्यांसाठी देणारा नेता..!

अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीत देखील काम करण्याची योगेंद्र गोडेंना मिळाली. तिथे काम करतांना मायभूमी बुलडाण्यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्र मंजूर करून घेतले. आज त्याच कृषी विज्ञान केंद्रामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना प्रयोगशील शेती करायला मदत होते.  महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेवर देखील काम करण्याची संधी योगेंद्र गोडेंना मिळाली. बुलडाणा तालुक्यात पहिले कृषी महाविद्यालय त्यांच्या पुढाकारातून उभे राहिले.

म्हणून राजकारणात..!

yg

 राजकारणात प्रवेशाविषयी योगेंद्र गोडे सांगतात, " समाजाला आपल्या कामाचा फायदा झाला पाहिजे. समाजकारणाला सत्तेची जोड मिळाली तर शासनाच्या मदतीने अधिकाधिक लोकांच्या समस्या सोडवता येतात, त्यांच्या आरोग्याचे शिक्षणाचे प्रश्न सोडवता येऊ शकतात. सत्तेच्या मदतीने जनउपयोगी प्रकल्प राबवता येतात" असे ते सांगतात. सध्या अमरावती येथे सुरू करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जनसेवेसाठी अर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.

 बॅनरबाजी पोस्टरबाजी नाही..थेट काम..!!

yg

बॅनरबाजी पोस्टरबाजी पेक्षा योगेंद्र गोंडेंचा कृतिशील कार्यक्रमांवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे सत्तेत असो किंवा नसो, पद असो वा नसो सामान्यांसाठी काम करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असो. २०१७ मध्ये योगेंद्र गोडेंनी बुलडाणा मोताळा तालुक्यातील प्रत्येक गावांत वारकरी साहित्यांचे वाटप केले. गावागावात धार्मिकता वाढली पाहिजे म्हणून मंदिरांना ध्वनिक्षेकांचे वितरण केले. कोविड काळात शासन - प्रशासन  हतबल असताना बुलडाणा आणि मोताळ्यात प्रत्येकी ३० आणि अमरावती येथे १०० बेडचे हॉस्पिटल  सुरू केले..आपल्याच समाजासाठी जे केलं त्याची प्रसिध्दी पोस्टरबाजी, गवगवा मात्र त्यांनी केला नाहीं.."मी केले ते समजासाठी उपकार केले नाही, समाजाचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून केले.. म्हणून समाजासाठी केलेल्या कामांचा गवगवा करणे आपल्याला पटत नाही" असे ते नेहमी सांगतात.

यंदाचा वाढदिवसही खास..!

yg
 

योगेंद्र गोडेंचा वाढदिवस हा दरवर्षी आगळ्या  वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. केवळ मरणदारी आणि तोरणदारी जाऊन पुढारीपणा मिरवण्यापेक्षा समाजाला पुढारलेपण आले पाहिजे हा विचार करणाऱ्या योगेंद्र गोडेंचा वाढदिवस समाजासाठीच असतो. गेल्या वाढदिवशी कॅन्सर रोगनिदान शिबिर त्यांच्या वाढदिवशी घेण्यात आले होते. यावर्षी त्याहीपुढे जाऊन नागरिकांना आरोग्य कार्डचे वाटप त्यांच्या टीम कडून करण्यात येत आहे. या आरोग्य कार्डाच्या माध्यमातून कोणत्याही आजारावरील निःशुल्क उपचार अमरावती येथे करण्यात येणार आहेत. त्यामुळे सामान्यांचा लाखो रुपयांचा वैद्यकीय खर्च वाचविण्याचे काम योगेंद्र गोडे यांच्या पुढाकारातून होत आहे. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना अनेकदा बी - बियाणे खते उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ही समस्या दूर व्हावी यासाठी शेतकऱ्यांना जैविक खते आणि बी - बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना शेती जोडधंद्याबाबत मार्गदर्शन शिबिर सुद्धा ठेवण्यात आले आहे.

  वरून टपकायंच नाही..लोकांमधून लढायच..!

yg

  मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. पक्षाकडे काही मागणार नाही मात्र मला लढायला संधी द्या एवढे नक्कीच मागेल.कुठल्याही सभागृहात वरून टपकायला मला आवडणार नाही मात्र लढायला  आवडेल असे योगेंद्र गोडे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बुलडाणा लाइव्ह शी बोलताना म्हणाले.