BIRTHDAY SPECIAL बुलडाणा भाजपचा युवा चेहरा सोहम झाल्टे! योगेंद्र गोडेंच्या तालमीत तयार झालेला सच्चा कार्यकर्ता..

 

बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): बाप आमदार ,खासदार किंवा सरपंच तरी असला तरी ती पोर राजकारणात यायची हिम्मत करतात.. नव्हे बापच पोराच्या भविष्याची काळजी म्हणून त्यांचं प्रमोशन करतो..हल्लीच राजकारण तसच..सामान्य कुटुंबातील सामान्य मुल छोकरी मिळण्याच्या आशेने केवळ नोकरी पाहतात..राजकारणात भविष्य नाही कारण आपल्याकडे पैसा नाही असं या मुलांना वाटत असतं..मात्र काही जण याला अपवाद असतात..घरचं कुणीच राजकारणात नसल तरी काही जण स्वकर्तुत्वावर या क्षेत्रात येतात अन् आपला ठसाही उमटवतात..त्यापैकीच एक नाव भाजपा युवा मोर्चाचे बुलडाणा शहर अध्यक्ष सोहम झाल्टे..वय अवघं २३ वर्षांचं..

gh

 बुलडाणा शहरात भाजपा युवा मोर्चाच चांगल संघटन बांधण्यात सोहमचा वाटा मोठा आहे. भाजप नेते योगेंद्र गोडे आणि शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या तालमीत तयार झालेला हा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने भाजपचा युवा चेहरा बनतोय..! युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांच्याकडे जिल्हा विद्यार्थी आघाडी अशी जबाबदारी होती, त्या जबाबदारीला देखील त्यांनी चांगला न्याय दिला.

  म्हणून राजकारणात..!

ghj

हल्ली तरुण व्यवस्थेला दोष देताना दिसतात..मात्र व्यवस्थेला दोष दिल्यापेक्षा आपण व्यवस्थेत शिरले पाहिजे आणि नंतर सकारात्मक बदल घडवले पाहिजेत असं सोहम झाल्टे यांना वाटत. आई आणि वडील शिक्षक असलेल्या सोहम झाल्टे यांच्या घरात आधीपासून संघाचे वातावरण..त्यामुळे जीवन जगायचे तर समाजासाठीच ही शिकवण त्यांना घरातून मिळाली. समाजसेवा करायची असेल तर त्याला राजकारणाची जोड असली पाहिजे म्हणून भाजप विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा त्यांनी केला. आधीपासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेला सुटत असल्याने भाजपचे फारसे मजबूत संघटन शहरात नव्हते. त्यामुळे संघटन मजबूत करण्यावर  सोहम झाल्टे सध्या भर देत आहेत. आगामी काळात बुलडाणा नगरपरिषदेची निवडणूक लढण्याचा देखील त्यांनी मानस व्यक्त केलाय. सोहम झाल्टे सध्या वकीलीचे शिक्षण घेत आहेत, आपल्या शिक्षणाचा समाजाला फायदा झाला पाहिजे, कारण आपल जीवन देण्यासाठी आहे..भाजपच्या माध्यमातून समाजासाठी जे जे करणे शक्य होईल ते ते करत राहू असेही सोहम झाल्टे सांगतात.