BIRTHDAY SPECIAL अन् नेतृत्व फुलत गेले! सामाजिक जाणिवा प्रगल्भ असलेल्या किशोर गारोळेंची कथाच न्यारी!
पडझडीच्या काळात शिवसेनेसोबत राहिले एकनिष्ठ...आता मेहकरवासियांना आहेत गारोळेंकडून अपेक्षा..
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "अगदीच इतरांसारखे नसावे अन् इंतराहून फार वेगळे न दिसावे" या नियमांचे पालन ज्याच्याकडून होते त्यालाच समाज आपला नेता मानत असतो..सर्वसामान्यांना वेळ देणारा, त्यांच्यात मिसळणारा , त्यांच्या सुख दुःखात जावून नेणाऱ्या माणसाला लोक डोक्यावर घेतात..अर्थात हे सगळे गुण ज्या माणसात ठासून भरलेले आहेत ते आहेत, मेहकरचे युवा उद्योजक ,शिवसेना शहरप्रमुख, मेहकर अर्बन चे अध्यक्ष किशोर गारोळे... किशोरभाऊंचा आज,८ सप्टेंबरला वाढदिवस..त्यानिमित्ताने थोडेसे...!
सिंदखेडराजा तालुक्यातील वरुडी सारख्या एका छोट्या खेड्यातून गारोळे परिवार मेहकर शहरात स्थायिक होतो अन् दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा, व्यवसायातील सचोटी आणि सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ या भरवश्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो..अर्थात सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन एवढं मोठं वलय निर्माण करणं सोपं नाही..पण जे कठीण त्यालाच हात घालायचा हा
गारोळे परिवाराचा स्थायीभाव..हाच कौटुंबिक वारसा समर्थपणे पुढे नेण्याचा काम किशोर गारोळे करीत आहे. व्यवसाय,उद्योग उभारायचा पण तेही सामाजिक बांधिलकी जपूनच हे किशोर गारोळेंच तत्व..त्यामुळेच शिवशक्ती ट्रॅक्टर या व्यवसायिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेहकर तालुक्यातील अनेक तरुणांना रोजगारक्षम बनवले..ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत उभी करण्यापासून तर त्याला काम उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळी जबाबदारी किशोरभाऊ पार पाडत असतात..
समाजकारणाला राजकारणाची जोड..
किशोरभाऊंना राजकीय वारसा मिळाला तो वडील भास्करराव गारोळे यांच्याकडून. मेहकर नगरपालिकेवर तीनदा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. ८० टक्के समाजकारण अन् केवळ २० टक्के राजकारण हा शिवसेनेचा विचार किशोरभाऊ जपतात..राजकारणाच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात म्हणून म्हणून किशोरभाऊंनी समाजकारणाला राजकारणाची जोड दिली. शिवसेनेच्या माध्यमातून मेहकर शहरात तरुणांचे मोठे संघटन त्यांनी उभे केले आहे. गेल्यावर्षी शिवसेनेत मोठी फूट पडली. स्थानिक खासदार, आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले..मात्र याही परिस्थीत किशोर गारोळे विचारांशी प्रामाणिक राहिले..एवढच काय त्या फुटीनंतर आणखी जोमाने काम करून मेहकर शहर व तालुक्यात शिवसेना जोमाने वाढवली..
आदित्य ठाकरेंची दमदार सभा..
गेल्या वर्षी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची मेहकरात दमदार सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी जमली. ही गर्दी पाहून स्वतः आदित्य ठाकरे देखील प्रभावित झाले. खासदार, आमदार नसतांना एवढी गर्दी जमणे ही साधी बाब नव्हतीच..या सभेचे परिपूर्ण नियोजन किशोर गारोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. त्या ऐतिहासिक सभेनंतर किशोर ग
गारोळे यांचे नेतृत्व आणखी फुलत गेले अन् त्यावर सर्वार्थाने शिक्कामोर्तब झाले.. आता मेहकरच्या जनतेला या युवा नेत्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, शहराच्या विकासासाठी किशोरभाऊच काय ते करू शकतात असं अनेकांचं म्हणणं आहे..अर्थात या सगळ्या अपेक्षांची पूर्तता किशोरभाऊ नक्कीच करतील..याच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..!!