सुंदर - अंजलीची प्रेमकहाणी..! अशा कितीतरी प्रेमकहाण्या आहेत ज्यामध्ये जोडपी लॉग डिस्टन्स रिलेशनशीप सांभाळू शकले नाही आणि कम्युनिकेशन गॅपमुळे ती अधिकच एकमेकांपासून दूर होत गेली.
पण नात्यात जर प्रेम आणि विश्वास असेल तर त्या नात्याला कोणतीच गोष्ट त्या नात्याला कमजोर करु शकत नाही आणि याचं जिवंत उदाहरण आहे सुंदर पिचाई यांची आदर्श प्रेमकहाणी...!
Updated: Dec 4, 2023, 13:15 IST
अशा कितीतरी प्रेमकहाण्या आहेत ज्यामध्ये जोडपी लॉग डिस्टन्स रिलेशनशीप सांभाळू शकले नाही आणि कम्युनिकेशन गॅपमुळे ती अधिकच एकमेकांपासून दूर होत गेली. पण नात्यात जर प्रेम आणि विश्वास असेल तर त्या नात्याला कोणतीच गोष्ट त्या नात्याला कमजोर करु शकत नाही आणि याचं जिवंत उदाहरण आहे सुंदर पिचाई यांची आदर्श प्रेमकहाणी!
जाहिरात 👆
गुगलच्या सीईओ पदी जेव्हा सुंदर पिचाई याची निवड झाली तेव्हा संपूर्ण भारताची मान अभिमानाने उचावली गेली. कारण एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या भारतीय मुलाने जगातील सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक असलेल्या कंपनीच्या मुख्य पदाला गवसणी घातली होती. पण सुंदर पिचाई यांचा इथवरचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. इथपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते. अनेक गोष्टींचा त्याग केला होता. पण या संपूर्ण प्रवासात एका व्यक्तीने त्यांना शेवटारवंत साथ दिली ती व्यक्ती म्हणजे सुंदर पिचाई यांच्या पत्नी अंजली पिचाई होय. जेव्हा सुंदर यांच्याकडे काही नव्हते तेव्हा सुद्धा वाळपणे त्यांच्या सोबत होत्या आणि म्हणून आज सुंदर पिचाई जगातील यशस्वी व्यक्तीपैकी एक असताना त्यांच्या सोबत उभ राहण्याचा पहिला हक्क अंजली यांचाच आहे. दोघांची ही लव्हस्टोरी आजच्या तरुणाईसाठी एक उत्तम आदर्श आहे.
मध्यमवगीय परिवारात जन्म
सुंदर पिचाई याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात असल्याने त्यांना आज ते त्या जागी उभे आहेत त्याची जाण आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की त्याच्याकडे लहानपणी टीव्ही सुद्धा नव्हता अशी त्यांची स्थिती होती पण आई वडिलानी शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही, म्हणूनच आज श्रीमंत असूनही त्यांना कशाचाच गर्व नाही. त्याची हीच गोष्ट अंजली याना आवडते आणि म्हणून त्यांनी सुंदर यांना आयुष्याचा जोडीदार निवडलं आणि कोणत्याही स्थितीत त्यांच्या सोबत आयुष्य काढण्यासाठी त्या तयार झाल्या.
कॉलेजमध्ये झाली ओळख
आयआयटी खडगपूरमध्ये सुंदर आणि अंजली याची भेट झाली होती. पहिले तर दोघे चांगले मित्रच होते. पण मैत्रीच प्रेमात रूपांतर व्हायला कितीसा वेळ लागतोय? आणि पुढे दीर्घ प्रेमाच्या नात्यात कायमसाठी जोडले गेले. डिग्रीच्या शेवटच्या वर्षांत सुंदर यानी अंजली यांना प्रपोज केले आणि अंजली यानी सुद्धा केवळ आणि केवळ त्यांचा स्वभाव पाहून होकार दिला. त्याना आपलं भविष्य काय असेल माहीत नव्हते पण त्याना सुंदर यांच्यावर खूप विश्वास होता.
६ महिने संवाद खुटला
आयआयटी पास झाल्यावर सुंदर पिचाई मास्टरस डिग्री घेण्यासाठी अमेरिकेमध्ये गेले पण आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अमेरिकेवरून अंजली यांना फोन करण्याएवढे पैसे सुद्धा त्याच्याकडे नव्हते, याच कारणामुळे तब्बल ६ महिने त्यांचे एकमेकांशी बोलणे सुद्धा झाले नाही. पण या गोष्टीमुळे त्यांचे नाते तुटले नाही. दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास होता त्यामुळे त्यांचे नाते अबाधित राहिले. अगदी २ दिवसही बोलणे न झाल्यास आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवणाऱ्या आणि नाते तोडणाऱ्या कपल्सनी या मधून बोध घ्यायला हवा..
कुटुंबाच्या परवानगीने लग्न ...
मास्टर्स झाल्यावर सुंदर यांना एका कंपनीमध्ये नोकरी लागली आणि त्यांना बऱ्यापैकी पगार त्यातून मिळू लागला व आर्थिक स्थिती हळूहळू सुधारायला लागली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व अंजली यांच्या घरच्यांच्या परवानगीने त्यांनी लग्न केले. लग्न करतानाही अंजली यानी केवळ आणि केवळ सुंदर पिचाई यांच्या मनाची श्रीमंती पाहिली आणि हा व्यक्ती आपली साथ कधीही सोडणार नाही अशी शाश्वती त्यांना होती. सुंदर यांच्याशी लग्न करून त्यांनी खरे प्रेम सिद्ध केले.
गुगल सोडू नकोस
सुंदर पिचाई यांनी जी मेहनत घेतली होती त्याचे फळ त्यांना अल्पावधीतच मिळू लागले. एका कंपनी मधून दुसऱ्या कंपनीमध्ये असे करत करत ते गुगलपर्यंत येऊन पोहोचले. इथे त्याच्या करियरने भरारीच घेतली. दरम्यानच्या काळात त्यांची कामगिरी पाहून त्यांना मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरसारख्या कंपन्यानी सुद्धा ऑफर दिली. पण अंजली यानी सुंदर यांना गुगल न सोडण्याचा सल्ला दिला आणि अंजली यांचा तो सल्ला किती मौल्यवान होता हे आपण पाहतो आहोच. या सर्व घटना दर्शवतात की आयुष्यातला जोडीदार हा असाच हवा जो तुमच्या सोबत कोणी स्थितीत राहण्यास तयार असेल आणि तुमची सोबत कधीही सोडणार नाही.