कौतुकास्पद..! बुलडाण्याची गोल्डन गर्ल! १३ वर्षीय खुशी ओफळकरने एकाच वर्षात मिळवले राष्ट्रीय स्थरावरील ६ गोल्ड मेडल! आतापर्यंत मिळवले पिशवीभर मेडल!
करिअर पॉइंट कोटाच्या फाउंडेशन बॅचची विद्यार्थिनी आहे खुशी!
Updated: Jun 17, 2024, 17:47 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय...कोण म्हणत बुलडाण्याच्या लेकी मागे आहेत..देशाला छत्रपती शिवाजी महाराज देणाऱ्या आई जिजाऊंच्या या भूमीचा गौरव वाढवण्याचे काम केले आहे ते बुलडाण्यातील खुशी मदन ओफळकर या १३ वर्षीय चिमुकलीने.. खुशीचे जेवढे वय आहे त्यापेक्षा दुप्पट तिप्पट राष्ट्रीय स्थरावरील विविध परीक्षांना ती सामोरे गेली आहे..केवळ सामोरेच गेली नाही तर अखिल भारतीय स्थरावर तिने या स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे..खुशी आता आठव्या वर्गात जाणार असून तिने गेल्या वर्षभरापासून करिअर पॉइंट कोटाच्या फाउंडेशन बॅचला प्रवेश घेतला आहे. तिथे देखील तिची कामगिरी दमदार असून तिचे भविष्य उज्वल असल्याचे करिअर पॉइंट कोटा टीम यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना सांगितले.
खुशीचे वडील ग्रामसेवक असून आई गृहिणी आहे. लहानपणापासूनच शार्प असलेल्या खुशीचा अभ्यासात प्रचंड वेग आहे. केवळ पाठांतर नव्हे तर आकलन क्षमता चांगली असल्याने अनेक राज्य ,राष्ट्रीय स्थरांवरील परीक्षांमध्ये खुशीने घवघवीत यश मिळवले आहे. २०२३ -२०२४ या वर्षात SCIENCE OLYMPIAD FOUNDATION अंतर्गत तिने तब्बल ६ गोल्ड मेडल मिळवण्याचा विक्रम केला आहे, समस्त बुलडाणेकरांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे. इंटरनॅशनल इंग्लिश ऑलंपियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलंपियाड, नॅशनल सायन्स ऑलंपियाड यामध्ये गोल्ड मेडल यासह अखिल भारतीय राजभाषा हिंदी भूषण पुरस्कारासह गोल्ड मेडल तिने मिळवले आहे. २०२३ मध्ये झालेल्या विदर्भ टॅलेंट परिक्षेत देखील तिने भूषणावह कामगिरी केली आहे.
खुशीची नवोदय साठी देखील निवड झाली होती याशिवाय केंद्रीय सैनिकी स्कुलसाठी तिची अरुणाचल प्रदेशात निवड झाली होती मात्र तिच्या कुटुंबीयांनी बुलडाणा येथेच खुशीचे शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. होमी बाबा बालशास्त्रज्ञपदी आणि डॉ. सी. व्ही. रमण बालशास्त्रज्ञपदी देखील खुशीची निवड झाली आहे. खुशी तिच्या यशाचे श्रेय ती आई वडील, बहीण आणि करिअर पॉइंट फाउंडेशनच्या बॅचच्या टीमला देते .
खुशीचे भविष्य उज्वल...
खुशीची कामगिरी दमदार आहे. खरे तर ती बुलडाणा जिल्ह्याचे भूषण आहे. राष्ट्रीय पातळीवर तिने जिल्ह्याचे नाव पोहचवले आहे. करिअर पॉइंटच्या फाउंडेशन बॅच च्या टीमचे खुशीच्या अभ्यासावर आणि प्रगतीवर बारीक लक्ष आहे. खुशीचे भविष्य उज्वल असून येणाऱ्या काळात ती आणखी चांगली कामगिरी करेल असा विश्वास करिअर पॉइंटच्या फाउंडेशन बॅच च्या टीम नी व्यक्त केला.