कडक सॅल्युट ! जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रणरागिणी शीतल मोगल यांनी वाचवला तरुणाचा जीव; खामगाव - बुलडाणा रस्त्यावर अपघात झाल्यावर कुणीच थांबत नव्हत, तेव्हा...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तारीख २९ मार्च..वेळ भर दुपारची.. अन् रखरखत ऊन..बुलडाणा खामगाव रस्त्यावर एका ३५ वर्षे वयाचा तरुणाचा अपघात झालेला.. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण पण कुणीही मदतीसाठी धावून येत नव्हत..स्वतःला उचभ्रू समजारे अनेक जण गाडीचा एसी फुल्ल करून तिथून जात होते..पण कुणालाही त्या तरुणाची दया आली नाही..उगाच कशाला पोलीस चौकशीचे झंझट म्हणून कुणीच थांबत नव्हत.! पण त्या थांबल्या..त्या तशा स्वतः गाडी चालवत खामगाव वरून बुलडाणा कडे येत होत्या..तिथे उपस्थितांना वाटलं एकटी महिला आहे, यांच्या गाडीत कस तरुणाला टाकाव? पण..त्यांनी तरुणाला आपल्या गाडीत टाकल अन् स्वतः गाडी चालवत जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल..! अपघात झाला त्यावेळी तरुण मी बेशुद्ध अवस्थेत होता, आता तरुणाची प्रकृती सुधारली आहे..जे पुरुषांना जमलं नाही ते जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचारिका श्रीमती शीतल मोगल यांनी करून दाखवलं..!
Add
Add
                           ( जाहिरात 👆 )
शीतल मोगल यांच्यामुळे एका तरुणाचे प्राण वाचलेत. वेळीच तरुणाला उपचार मिळाले नसते तर..?याची कल्पनाच नं केलेली बरी.." मी वेगळं काही केलं नाही, मी फक्त माझे कर्तव्य पार पाडले' आपल्यासमोर तो तरुण तडफडतोय,हे पाहून मी जर तिथून निघून आले असते तर देवानेही माफ केलं नसत." अशी प्रांजळ प्रतिक्रिया शीतल मोगल यांनी दिली. अपघातानंतर आपल्याकडून शक्य ती मदत केलीच पाहिजे असे त्या म्हणाल्या.सर्वच स्तरातून श्रीमती शीतल मोगल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ..