खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे उघडले! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; पहा व्हिडीओ...

 
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यासह जिल्ह्यात गत दोन दिवसांत चांगलाच पाऊस बरसला. विशेषतः मराठवाड्यात तुफान पाऊस कोसळला. त्यामुळे आतापर्यंत तळ गाठलेले खडकपूर्णा धरण जवळपास ९४ टक्के पर्यंत भरले आहे. आज खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे ०.५० सेमी ने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या ३१ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक वाढली आहे. सावधगिरी म्हणून धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग जास्त किंवा कमी करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावध रहावे, नदीपात्रात जाऊ नये. नदी काठावर गुरेढोरे बांधली असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहन करण्यात आले आहे.