चहू बाजूंनी पाणीच पाणी , झाली असती जिवीत हानी...! खामगाव तालुक्यातील कोलेरी गावात 'अशी' झाली पुरबाधितांची जलप्रलयातून सुटका..! वाचा थरारक स्टोरी..

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हाभरात कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली. आज ८ जुलै रोजी खामगाव तालुक्यात पावसाचा जोर इतका जास्त होता की, जणू जलप्रलय आला आहे.. नद्या, नाल्या ओसंडून वाहून गेल्या कित्येकांच्या घरात पाणी शिरलं.. कित्येकांचा संसार वाहून गेला.. यामध्येच खामगाव तालुक्यातील कोलेरी गावात अनेक जण पुराच्या वेड्यात अडकले होते. चहूबाजूंनी पाणी होतं, जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु गावकरी आणि प्रशासनाने या जलप्रलयाचा खंबीरपणे सामना केला. कोलेरी गावातील ११ जणांची पाण्यातून सुटका केली आणि प्राण वाचवलेत..

हा जलतांडव अगदी सकाळचाच होता. खामगावात पोहोचण्यासाठी, अनेक मार्ग बंद झाले होते. वाहतूक ठप्प झाली होती. एकंदरीतच जनजीवन विस्कळीत झालेले. अशातच खामगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये आभाळ कोसळणारा पाऊस झाला. यामध्ये कोलोरी गावात अतिवृष्टी झाली. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी अकोला रोडला लागून असलेल्या शेतात पाणी साचले. शेतात अनेकांची घर होते. घराघरात पाणी शिरलं.. आणि घरामधले सदस्य पाण्याच्या घेरावाने घेरल्या गेले. सगळे गावकरी, गावातल्या लोकांची एकच धावपळ सुरू झाली. काहीही करून शेतातील ग्रामस्थांना वाचवायचे असे सगळ्यांनीच ठरवले. गावचे पोलीस पाटील गणेश टिकर यांनी तहसील, पोलीस, आपत्ती विभागाला तातडीने माहिती दिली. जोपर्यंत प्रशासन पोहचत नाही, तोपर्यंत ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू ठेवले. घटनास्थळी बुलढाणा, खामगाव येथून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक पोहोचले. तहसीलदार देखील घटनास्थळी आले. बोटीच्या साह्याने, रोप वे च्या आधाराने पाण्यात उतरून पुरबाधितांना वाचविण्याचे कार्य सुरू झाले. 
जलप्रलयातून यांची झाली सुटका! 
जगदीश बारेल, सखाराम बारेल, मनीषा भरेल, रूहानी बारेल, ऐश्वर्या, आशिष हे एका कुटुंबातील सहा जण शेतातील घरात अडकले होते. त्यांना वाचविण्यात आले आहे. तसेच अभिमन्यू सेजव, संदीप डोंगरे, विनोद सरदार हे देखील पाण्याचे विळख्यात अडकले असताना त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी यश आले. 
शेतपिकांचे नुकसान! 
शेतातील नवलागवडीत पिकांचे नुकसान झाले असून कापूस सोयाबीन असे पिके जमीनदोस्त झाली आहे. सुदैवाने या चित्तथरारक घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. परंतु शेतातील व घरातील अतोनात नुकसान झाल्याचे दिसत आहे. पुर बाधितांसाठी शासनाने तातडीने मधील शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, पूर बाधितांची अवस्था जाणून घेण्यासाठी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. आकाश फुंडकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.