क्रांतिदिनानिमित्त पिंपळगाव राजा येथे विविध कार्यक्रम! रक्तदान शिबिर, युवक मेळावा, महिला बचतगटांना कर्जवाटप; वन बुलडाणा मिशनचे आयोजन

 
one buldana mission

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनच्यावतीने क्रांतिदिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर, युवक मेळावा तसेच महिला बचत गट कर्ज वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील स्वातंत्र्यसेनानी स्व. हसनराव देशमुख सभागृहात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेऊन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून वन बुलडाणा मिशन ही लोकचळवळ कार्यरत आहे. त्याअनुषंगाने सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. क्रांतिदिनानिमित्त खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे रक्तदान शिबिर, युवक मेळावा आणि महिला बचतगटांना कर्ज वाटपाचा  कार्यक्रम आयोजित केला आहे.