Amazon Ad

उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांनो १ लाख रुपये भरायची तयारी ठेवा! थेट होणार कारवाई...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगरपालिका क्षेत्रात कचऱ्याची मोठी समस्या आहे. नगरपालिकेच्या घंटा गाड्या असल्या तरी त्या नियमित नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिक अनेकदा उघड्यावर कचरा जाळून त्याची विल्हेवाट लावतात. मात्र असला प्रकार कायद्याच्या दृष्टीने फायद्याचा नाही.
उघड्यावर कचरा जाळणे हा पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे. त्यासाठी कायद्यात कठोर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र यावर कारवाई होतच नसल्याने सामान्य नागरिकच काय तर सफाई कर्मचाऱ्यांना देखील याबद्दलची माहिती नाही. बुलडाणा शहरात तर नगरपालिकेचे अधिकृत सफाई कर्मचारी देखील जमा केलेला कचरा उघड्यावर ,सार्वजनिक ठिकाणी पेटवून देतांना अधूनमधून दिसतात.
 
मात्र आता उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे संकेत मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. आता कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. कायद्यानुसार उघड्यावर कचरा जाळणे उपद्रवी कृत्य म्हणून गणल्या जाते.
कायदा काय सांगतो...
उघड्यावर कचरा जाळणे हा पर्यावरणविषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसार देखील गुन्हा आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका यांना यावर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या एका निर्णयानुसार अशा प्रकरणांत एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो...