बोरी- अडगाव,शहापूर रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरूच,अजूनही पूर्ण होईना! अर्धवट कामामुळे वाहनांचे नुकसान, प्रवाशांनाही त्रास!

 
जद
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या खामगाव तालुक्यातील बोरी - अडगाव ते शहापूर या मुख्य रस्त्याचे काम अजूनही अपूर्णच आहे. वाहन चालक, प्रवाशी यांना नाहक त्रास होत, असला तरी मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे.
मागील सहा महिन्याआधी खामगाव बोरी-अडगाव ते शहापूर या मुख्य रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते.सहा महिने उलटून गेले तरीही रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. याचाच त्रास रस्त्याने येणारा - जाणाऱ्या वाहनासह नागरिकांना सहन करावा लागत आहे. बोरी - अडगाव गावांमधील रस्त्याचे कामही अपूर्णच झाल्याने गावातील नागरिकांना सुद्धा याचा त्रास होत आहे. पहिल्या टप्प्यातील जाडी खडी डांबरीकरणाचे काम करून बाकीचे काम थांबल्यामुळे वाहनधारकांना या रस्त्याचा फटका बसत असल्याने वाहनाचे नुकसान होत आहे.रस्त्यात टाकलेल्या बारीक चुरीमुळे दुचाकी चालक, ऑटोचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्याआधी या मुख्य रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.