कार्यक्रमाची वेळ साडेअकराची! १ वाजता पोहचले मुख्यमंत्री! शासन आपल्या दारी कार्यक्रम दीड तास लेट..

 
Bdh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी बुलडाणा शहरात आले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या कार्यक्रमाची वेळ साडेअकरा ते दीड अशी ठेवण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर १ वाजता बुलडाण्यात पोहचले.
  यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला आहे . उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री अजून पर्यंत कार्यक्रमाला पोहचले नाहीत. स्वतः मुख्यमंत्री शिंदे साडेअकराला कार्यक्रमस्थळी पोहचणार होते मात्र शेवटचे वृत्त दुपारी १ वाजून ३ मिनिटांनी त्यांचे हेलिकॉप्टर बुलडाण्यात पोहचले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, आमदार संजय गायकवाड, आ. संजय कुटे, आ. संजय रायमुलकर कार्यक्रमस्थळी पोहचले आहेत.