खाकी वर्दीची अस्मिता ! मिस मिसेस मिस्टर महाराष्ट्र पोलीस आयकॉन स्पर्धेत विदर्भातून प्रथम

 
Vvbm
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा पोलीस दलात काही पोलीस कर्तव्यनिष्ठ असतात. यामध्ये महिला पण पुढे आहेत. बाईपण भारी असलं तरी पोलीसपण देखील भारी आहे. अशात जिल्हा पोलीस मुख्यालयातील मोटार वाहन विभागातील महिला चालक अस्मिता अशोक निंबाळकर यांनी पुणे येथील ४७ स्पर्धकांमधून मिस मिसेस मिस्टर महाराष्ट्र पोलीस आयकॉन २०२३ स्पर्धेत विदर्भातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस दलासह नागरिकांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
 शोभा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे संचालक प्रदिपकुमार बनसोडे, धर्मपाल वर्मा, संजू वर्मा, सुधा कापडी, सतीश सूर्यवंशी यांनी मिस मिसेस मिस्टर महाराष्ट्र पोलीस आयकॉन स्पर्धा आयोजित केली होती. पोलीस कर्मचारी दिवसरात्र ऊन, वारा पाऊस अश्या सर्व परिस्थिती मध्ये जनतेचे संरक्षण करत असतात. सामाजिक जाण-भान असलेल्या संस्थेने २४ तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवासाठी मिस मिसेस किड्स मिस्टर महाराष्ट्र पोलीस आयकॉन २०२३ ही स्पर्धा २७ ऑगस्ट रोजी पुणे येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धे मध्ये जिल्हा पोलीस मुख्यालयातील मोटार वाहन विभागातील महिला चालक अस्मिता अशोक निंबाळकर यांनी ४८ स्पर्धकांमधून विदर्भातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांचे पोलीस दलातून अभिनंदन होत आहे.