BIG BREAKING म्हटल होत तसच झालं! शासन आपल्या दारी मात्र आपण आपापल्या घरी;चिखली तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उद्याच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर बहिष्कार!

महाविकास आघाडीच्या रास्तारोकोला पाठिंबा..
 
Ghnb
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उद्या बुलडाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व इतर काही मंत्री उद्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ३० हजार लाभार्थ्यांची या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र आता या कार्यक्रमात अडचणी निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर जालन्यात काल, पोलिसांनी लाठीमार केला. त्याचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली आहे. उद्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा चिखली तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.आज सायंकाळी चिखलीच्या विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. "शासन आपल्या दारी मात्र आपण आपापल्या घरी" असा निर्णय प्रत्येक मराठा बांधवांने घेऊन उद्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा आणि सरकारला धडा शिकवावा असे आवाहन चिखलीत झालेल्या बैठकीत करण्यात आले.
Hxb
आज सकाळीच "बुलडाणा लाइव्ह" ने सूत्रांच्या हवाल्याने तशी शक्यता वर्तवली होती. ती तंतोतंत खरी ठरली. दरम्यान जिल्हाभरातील इतर तालुक्यांत सुद्धा सकल मराठा समाजाच्या बैठकी सुरू असून त्या तालुक्यांतून सुद्धा उद्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बुलडाण्यात आज सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा निषेध केला, उद्याचा शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊ अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.