राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उद्यापासून ३ दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर! वाचा कुठे कुठे जाणार, काय काय करणार...

 
lkfljdsl
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या दिनांक १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान त्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबरला   जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या जनसुनावणीस उपस्थित राहतील.

दौऱ्यानुसार श्रीमती चाकणकर यांचे गुरूवार, दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होऊन मुक्काम करतील. शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठक घेईल. तसेच सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. शनिवार, दि १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळाला भेट देतील.त्यानंतर सोईनुसार छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.