राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आज जिल्ह्यात! एवढे होऊनही पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा पत्ता नाही

 
patil
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. घाटाखालील तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीचा ते आढावा घेणार आहेत. मात्र एवढी अतिवृष्टी होऊनही, लोकांची दैना होऊनही पालकमंत्री गुलाबराव पाटील मात्र कुठे आहेत? असा सवाल आता विचारल्या जात आहे. काल,२२ जुलैला ते जळगावात होते,तिथे त्या जिल्ह्याची त्यांनी आपत्तीबाबत आढावा बैठक घेतली. 
 

१९ जुलैला मलकापूर, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यांत अतिवृष्टी झाली. त्यानंतर पुन्हा काल,२२ जुलैला जळगाव जामोद संग्रामपूर या तालुक्यांला पावसाने झोडपले. मोठ्या प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी देखील झाली.त्यामुळे या आपत्तीचा आढावा घ्यायला ना. अनिल पाटील जिल्ह्यात येत आहेत. आज २३ जुलैच्या दुपारी ४ वाजता  ना.अनिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मलकापूर साठी रवाना होतील. तिथे पाहणी केल्यानंतर तिथून रात्री १० वाजता विदर्भ एक्स्प्रेसने मुंबई कडे रवाना होतील.