एसपी सारंग आवाड यांना पदोन्नती! पुण्यात पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून रुजू होणार; जिल्ह्याला मिळणार नवीन एसपी

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांना पदोन्नती मिळाली आहे. आज महाराष्ट्र शासनाने पदस्थापना करण्याचे आदेश काढले, त्यात सारंग आवाड यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
 

सारंग आवाड आता  पुण्यात पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून काम सांभाळणार आहेत. अरविंद चावरीया यांची बदली झाल्यानंतर २० ऑक्टोबर २०२२ पासून आवाड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. नागपुरातून ते बुलडाण्यात आले होते.   जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून ६ महिने त्यांनी कारभार सांभाळला. आता जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक कोण मिळणार याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागून आहे.