जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणांनी व्यापणार बुलडाण्याचे आसमंत! बुधवारी बुलडाण्यात धडकणार मराठा क्रांती मोर्चाचे वादळ;तयारी अंतिम टप्प्यात! वाचा कसे आहे नियोजन...
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सकल मराठा क्रांती मोर्चा ची भूमिका पूर्वीप्रमाणे यंदा देखील संयमी राहणार आहे.इतर घटकांचा आदर करीत आपली रास्त मागणी संविधानिक मार्गाने मराठा मोर्च्यातून मांडली जात आहे,. मात्र संयमाचा कडेलोट होत असल्याने 13 सप्टेंबर च्या मोर्चात यावेळी घोषणांचा पाऊस देखील पडणार असल्याने बुलढाण्याचे आसमंत दुमदुमून जाणार आहे. आरक्षणासाठी हुंकार भरला जात असून मोर्चाची वेळ जवळ येत आहे. तसे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात उपोषण, निवेदन देऊन सामाजिक पाठिंबा देखील दर्शविला जात आहे.
बुलढाणा येथे मराठा आरक्षणासाठी यापूर्वी देखील क्रांती मोर्चा काढण्यात आला. लाखो समाज बांधव त्यात सहभागी झाले. हीच स्थिती राज्यभर होती. मात्र तेव्हापासून आज तगायत मराठा आरक्षण चा तिढा सुटू शकला नाही. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी जवळजवळ सर्वांनीच मान्य केली आहे. प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनी देखील वेळोवेळी आरक्षणावर भाष्य केले आहे. मात्र मोठ्या समूहाचा हा प्रश्न दुर्लक्षित आहे. त्यात जालना जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जारंगे पाटील या तरुणाने उपोषण छेडले आहे. या उपोषणास सर्वत्र पाठिंबा दिला जात आहे. मराठा आरक्षणासाठी ची मागणी आणि जालन्यात झालेल्या लाठी आल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी बुलढाण्यात मोर्चा आयोजन आहे.
घोषणाही ठरल्या
मागील वेळी निघालेला क्रांती मोर्चा पूर्णतः मूक होता. मागण्यासाठी समाजिक सागर उसळला मात्र एक घोषणा देखील दिली गेली नाही.मूक राहून समाज हुंकार भरत होता तो आज तागायत राज्यकर्त्याना कळू शकला नाही. यंदा मात्र 'जय जिजाऊ' 'जय शिवराय' ही मुख्य घोषणा राहणार आहे. शिवाय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं-- मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अंतरवाली घटनेचा तीव्र निषेध सह एक मराठा - लाख मराठा गजर देखील होणार आहे. एकूणच यंदा घोषणांनी बुलढाण्याचे क्षितिज व्यापणार आहे.
अशी आहे पार्किंग व्यवस्था
जिल्ह्याच्या सर्वच भागातून मोर्चेकरी येत असल्याने ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यात अजिंठा धाड रोडवरून येणाऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंग राहणार आहे. घाटा खालून म्हणजे मोताळा- मलकापूर रोड ने येणाऱ्यांसाठी गुलाबचंद नगर तसेच चिखली मेहकर वरून येणाऱ्यांसाठी जिजामाता कॉलेज प्रांगण व डीएड कॉलेजच्या प्रांगणात पार्किंग जाणार आहे. शहरातील लोकांसाठी कवीदीप हॉस्पिटल जवळ व्यवस्था उभी करण्यात आली आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्यांचे गठन करण्यात आले असून समन्वयकांकडून जय्यत नियोजन सुरू आहे.