जिल्ह्यातल्या ६ पत्रकारांचा समाज सेवा गौरव पुरस्काराने आज होणार सन्मान! दर्पण पत्रकार व संपादक फाऊंडेशन संस्थेद्वारे दिला जाणार पुरस्कार;

आज संतनगरी शेगावात वितरण! देशोन्नतीचे राजेंद्र काळे, "बुलडाणा लाइव्ह" चे कृष्णा सपकाळ, ज्ञानेश्वर ताकोते सन्मानाचे मानकरी! मयूर निकम, धनराज ससाने,सदानंद सिरसाट यांचा होणार गौरव..

 

शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समाजासाठी झटणाऱ्या जिल्ह्यातील ६ निर्भिड पत्रकारांना आज,२६ ऑगस्ट रोजी समाजसेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नागपूर येथील पत्रकारांसाठी झटणारी संघटना म्हणून ओळख असलेली दर्पण पत्रकार व संपादक फाऊंडेशन नागपूर द्वारा हा सन्मान करण्यात येणार आहे. संतनगरी शेगावात आज दुपारी २ वाजता हा सोहळा रंगणार आहे. 

ss

दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, लाइव्ह ग्रुप चे समूह सल्लागार तथा बुलडाणा लाइव्ह चे जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ, बुलडाणा लाइव्ह चे घाटाखालील विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते,लोकमत चे हॅलो हेड प्रमुख सदानंद शिरसाट, देशोन्नतीचे क्राईम रिपोर्टर धनराज ससाने, झी २४ तास चे मयूर निकम या पत्रकारांना समाज सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा,काँग्रेस नेते अविनाश देशमुख, शेगावचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, संपादक फाऊंडेशन चे संस्थापक सुशील पांडे, राष्ट्रीय सचिव संजय तिवारी, पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक राजेंद्र पथक, संपादक फाऊंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश शुक्ला या मान्यवारांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.