श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे १६ जुलैला होणार जिल्ह्यात आगमन! मेहकर - सुलतानपूर - सिंदखेडराजा - जालना रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद! प्रशासनाने सुचवला "हा" पर्यायी रस्ता ​​​​​​​

 
gajanan maharaj

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्री संत गजानन महाराज पालखीचे दि १६ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजता माळ सावरगाव, ता. सिंदखेडराजा येथे जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होत आहे, परतीच्या पालखी बंदोबस्तासाठी दि. १६ ते १७ जुलै २०२३ पर्यंत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

add

               ( जाहिरात )

सध्याचा प्रचलित मार्ग मालेगाव (जिल्हा वाशिम) मेहकर- सुलतानपुर - सिंदखेडराजा - न्हावा- जालना या रस्त्याला पर्यायी मार्ग मालेगाव (जिल्हा वाशिम) मेहकर - चिखली - देऊळगाव राजा - जालना या रस्त्यावर १६ जुलैच्या दुपारी  वाजेपासून  १७ जुलैच्या रात्री १२ पर्यंत वळविण्यात आली आहे. वाहनधारकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.