जिल्ह्यात पुढील ५ दिवस पावसाचे! पण....वाचा काय आहे हवामानाचा अंदाज ! शेतकऱ्यांना दिलाय "हा" महत्वाचा सल्ला....
जिल्हा कृषी हवामान केंद्राने जाहीर केलेल्या ५ दिवसीय हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात २६,२७ व २९ सप्टेंबरला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी तर ३० सप्टेंबरचा दिवस मात्र सुखावणारा ठरणार आहे, कारण या दिवशी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना दिलाय हा सल्ला..
मुग, उडीद पिकांची कापणी झाली असल्यास संबंधित शेत रब्बी पिकांसाठी तयार करताना जमिनीतील ओलावा टिकून राहील या पद्धतीने मशागत करावी.करडई, रब्बी ज्वारी या पिकांची पेरणी पाऊसमान लक्षात घेऊन करावी. लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव जनावरांना होऊ नये म्हणून, जनावरांचा गोठा निर्जंतुक करून घ्यावा. तसेच गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा असा कृषी सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र व जिल्हा कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना दिला आहे..