अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर!, खामगावात पार पडली शांतता सभा; खामगाव पोलिसांचे पक्के पूर्वनियोजन

 
Zngc
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अनंत चतुर्थी व ईद-ए-मिलाद उत्सव एकाच दिवसी आल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या हेतूने तद्वतच धार्मिक, जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते.स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह येथे २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शांतता समितीची सभा पार पडली. 
या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार एड आकाश फुंडकर होते तर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील ,तहसीलदार अतुल पाटोळे, नगर पालिका प्रभारी मुख्याधिकारी जयश्री काटकर मंचावर उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे उत्सव शांततेत व आनंदाने साजरे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अमोल अंधारे, रामदादा मोहिते, देवेंद्र देशमुख, ओंकारआप्पा तोडकर, गजाननराव देशमुख, कमरुजम्मा,अशोक ढगे, विजय वानखडे,मुक्तेश्वर कुलकर्णी यांच्यासह शांतता समितीचे आदी सदस्य उपस्थित होते.