माजी सैनिकांच्या कामाची बातमी! सैनिक कल्याणच्या पदभरतीमध्ये अर्ज करण्यास मुदतवाढ
Mar 7, 2024, 17:38 IST
बुलडाणा (जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सरळसेवेतील पदभरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
सैनिक कल्याण विभागाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची पदे भरण्यासाठ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी दि. १२ फेब्रुवारी २०१२४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून दि. ३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा कालावधी देण्यात आला होता. परंतू लोकहितार्थ ऑनलाईन अर्ज मागविण्याचा कालावधी दि. ४ ते २४ मार्च २०२४ पर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. याचा माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.