बातमी शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाची! "या" कामासाठी लगेच तुमच्या कृषी सहाय्यकांना भेटा! फायदा होईल...

 
Bcnc
बुलडाणा( जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाण्यांसाठी अर्ज घेण्यास सुरवात झाली आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२४-२५ मध्ये अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके, नगदी पिके कापूस व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्याक्षिके वैयक्तिक शेतकरी, गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करून नोंदणी करावी लागणार आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके, नगदी पिके कापूस व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीत धान्य कार्यक्रम जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो. यात कडधान्य पिकामध्ये तूर, मुंग, उडीद, सोयाबीन अधिक तूर, भरडधान्य पिकात मका, पौष्टिक तृणधान्यात खरीप ज्वारी, गळीत धान्य व तेलताडामध्ये सोयाबीन, भुईमूग, तीळ, व्यापारी पिकात कापूस यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.