पूरग्रस्तांना मदतीसाठी मनसेने जोपासली सामाजिक बांधिलकी! "बुलडाणा लाइव्ह" च्या साडी चॅलेंज उपक्रमात सहभाग!
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यांतील काही गावांत ढगफुटी झाली.या पावसाने सर्वत्र हाहाकार झाला. या महापुराने जवळपास १ लाख हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. २०३ गुरे दगावली आहेत. २२८६ नागरिक बेघर झाले आहेत. याव्यतिरिक्त कित्येकांच्या भिंती खचल्या, घरातले अन्नधान्य, स्वयंपाकाची भांडी, कपडे सगळ काही पुराने वाहून गेले आहे. या दोन तालुक्यात पूराने मागील ८० वर्षांचा रेकॉर्ड तोडला असुन यात हजारोंचे संसार आता चिखलात फसले आहेत. नुकसानग्रस्त भागात आपलेच समाजबांधव राहतात या नात्याने त्यांना सहकार्य करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे बुलढाणा लाइव्ह ने आपल्या माय- माऊल्यांसाठी "साडी चॅलेंज" या उपक्रमामध्ये मनसे परिवार सुध्दा सहभागी झाला. आज, २६ जुलै रोजी मनसे जनसंपर्क कार्यालय चिखली येथे बुलढाणा लाइव्हचे प्रतिनधी गणेश धुंदळे यांचेकडे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांचे हस्ते पूरग्रस्तांना मदत म्हणून कपडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख, विभाग अध्यक्ष निशांत गायकवाड, संजय दळवी सुनील ठेंग उपस्थित होते.