लोकसभेत हुकलं, विधानसभेत हूकायला नकोना ! म्हणून पहिले करा हे काम.. आपले नाव मतदार यादीत आहे काय? किंवा नवीन नोंदणी करायची तर काय आहे 'प्रोसेस' बातमीत वाचा..

 
Ghjj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) २०२४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. देशातील सर्वात मोठी निवडणूक पार पडली, नव्याने सरकार स्थापित झाले. आता राज्य सरकार स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ लाख ५७ हजार ६१ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये ८० हजार नव मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात प्रथमच सहभाग घेतला होता. दरम्यान, जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यामध्ये, मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून खात्री करावी व १ जुलै रोजी १८ वर्ष पूर्ण होत असलेल्या तरुणांनी नव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. आज २६ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
  मतदार नोंदणी अर्ज ऑनलाइन स्वरूपात करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट देता येते. आणि वोटर हेल्पलाइन ॲपचा उपयोग करून सदर अर्ज केल्या जातो. शिवाय, ऑफलाइन स्वरूपात बीएलओ तसेच संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येणार आहे. अथवा १९५० या टोल फ्री क्रमांकावर मतदार आपले मतदार यादीत नाव असल्याची खात्री करू शकतात. त्याबरोबरच, २४ जुलै पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करणार आहेत. त्यामध्ये ऑनलाइन स्वरूपात नमुना ६ क्रमांकाचा अर्ज भरत नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर २५ पर्यंत एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. व ९ ऑगस्ट दरम्यान याबाबत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. १९ ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येईल आणि २० ऑगस्ट रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
    मतदार यादीतून नाव गायब झाल्यास मतदार कारणीभूत! 
   गत लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकांचे नाव मतदार यादीतून गायब असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची पुष्टी करत मतदारांनी स्वतः जागृक राहून आधीच आपले नाव तपासावे. अंतिम समयी समजल्यापेक्षा मतदानाच्या काही दिवसांपूर्वीच मतदारांनी स्वयंस्फूर्तीने होणाऱ्या मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. मतदार यादीतून नाव गायब झाल्यास स्वयं मतदार यासाठी कारणीभूत ठरेल.