जालन्यातील लाठीमार प्रकरणाचे सिंदखेडराजात पडसाद! सिंदखेडराजा तहसील कार्यालयात पेट्रोल घेऊन घुसण्याचा प्रयत्न...

 
सिंदखेडराजा( बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. काल,बुलडाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीने रास्तारोको आंदोलन केले. आजदेखील काही ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. दरम्यान सिंदखेडराजा तहसील कार्यालयात एकाने पेट्रोल घेऊन घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज,४ सप्टेंबरला घडली.
 

सिंदखेडराजा तहसील कार्यालयात आज राडा झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा  प्रमुख सिद्धू गव्हाड यांनी पेट्रोल घेऊन तहसील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. तहसील कार्यालयात आत्मदहन की तहसील कार्यालय पेटवून देणे यापैकी त्यांच्या डोक्यात काय होते हे त्यांनाच ठाऊक. मात्र बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी वेळीच झडप घालून गव्हाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.